Join us  

बॉलिवूडमधील घराणेशाहीवर प्रियंका चोप्राचं मोठं वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2018 5:31 PM

बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्राने एका मुलाखतीत इंटस्ट्रीतील घराणेशाहीबाबत मोठं वक्तव्य केलं.

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्राने एका मुलाखतीत इंटस्ट्रीतील घराणेशाहीबाबत मोठं वक्तव्य केलं. 'बॉलिवूडच्या प्रॉडक्शन हाऊससोबत काम करणं कठीण असतं, जर तुम्ही एखाद्या फिल्मी परिवारातील असाल तर हेच काम सोपं होतं', असं प्रियंका म्हणाली. हे सगळं प्रियंका आपल्या बॉलिवूड करिअरबाबत बोलताना म्हणाली. 

प्रियंका म्हणाली की, 'मिस वर्ल्ड हा किताब जिंकल्यानंतर बॉलिवूडचा प्रवास थोडा सोपा होता. पण सुरुवातीच्या काही काळासाठी अनेक अडचणींचा सामना मला करावा लागला होता'.

प्रियंका पुढे सांगते की, 'जेव्हा मी बॉलिवू़डमध्ये आले आणि आपल्या करिअरला सुरुवात केली तेव्हा मी कुणालाही ओळखत नव्हते. इथे प्रत्येकजण एकमेकांचे नातेवाईक होते. अशात स्वत:ची जागा तयार करणं कठीण होतं'. 

एखादा सिनेमा साईन केल्यावर त्यातून काढले जाण्याच्या भीतीबाबत ती सांगते की, 'जेव्हा मला सिनेमांच्या ऑफर मिळू लागल्या तेव्हा मला या गोष्टीची भीती होती की, मला या सिनेमातून बाहेर काढलं जाईल. मला हे वाटतं की, जर तुमच्यात काही गुण असेल तर तुम्हाला नक्की संधी मिळायला हवी. हेही खरंच आहे की, माझ्याही काही संधी हिसकावल्या गेल्या'.

दरम्यान, प्रियंका चोप्राला 2002 मध्ये अब्बास-मस्तान यांच्या हमराज सिनेमाची ऑफर देण्यात आली होती. पण नंतर तिला कोणतही कारण न देता काढून टाकण्यात आलं होतं. त्यानंतर प्रियंकाने द हिरो या सिनेमातून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. 

टॅग्स :प्रियंका चोप्राबॉलिवूड