Join us
Daily Top 2Weekly Top 5

जास्त स्टायलिश दिसणं प्रियंका चोप्राच्या आलं अंगाशी, ट्रोलर्स म्हणाले - 'पळा भूतीण आली...'

By तेजल गावडे | Updated: October 12, 2020 21:17 IST

प्रियंका चोप्राचा ड्रेस, स्टाईल आणि मेकअप पाहून चाहते हैराण झाले होते आणि तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता.

बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत आपल्या दमदार अभिनय आणि स्टाइल स्टेटमेंटमुळे अभिनेत्री प्रियंका चोप्राने आपली ओळख निर्माण केली आहे. प्रियंका चोप्राने गेल्या काही वर्षांमध्ये मोनोक्रोमैटिक्स आउटफिट्स, सेक्सी ड्रेसेस, पेन्सिल गाउन्स आणि हाय स्लिट्समधून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. मात्र बऱ्याचदा स्टायलिश दिसण्याच्या नादात प्रियंकाला ट्रोलिंगचाही सामना करावा लागला आहे. असेच काहीसे मेट्रोपॉलिटन म्युझिअम ऑफ आर्टमध्ये पार पडलेल्या मेट गाला २०१९च्या इव्हेंटमध्ये प्रियंका चोप्राची अतरंगी स्टाईल पाहून लोक हैराण झाले होते. 

प्रियंकाने आपला लूक इव्हेंटनुसार केला होता पण ड्रेस आणि मेकअपसोबत जास्त एक्सपेरिमेंट झाला आणि लूक बिघडून गेला. खरेतर या इव्हेंटसाठी प्रियंकाने लक्झरी ब्रॅण्ड डिओरचा सिल्व्हर अँड पिंक हाउट कॉउचर फेदर गाउनची निवड केली होती. ज्यात हाय सिल्ट्सला मायक्रो प्रिंटवाली जाळीदार नेटसोबत जोडले गेले होते. इतकेच नाहीतर या फेदर ड्रेसला स्टायलिश बनवण्याचे काम हॉल्टर नेकलाइन करत होती. ज्याला ब्लॉक कट्ससोबत डिझाईन केली होती. प्रियंकाच्या या ड्रेसला मागून एक फिशटेलदेखील होती ज्यावर वेगवेगळ्या रंगाची पिसे लावलेली होती.

प्रियंकाचा ओव्हरऑल लूकबद्दल सांगायचं तर या स्टायलिश गाउनला पिंजऱ्यासोबत एक टिस क्रॉसवाला काटेरी हेडगिअर क्राउनने स्टाईल केले होते. ज्यासोबत ड्रामेटिक मेकअपही केला होता. जे पाहून लोक हैराण झाले होते. 

प्रियंकाचा हा लूक पाहून लोकांना खूप हसू आले होते. पण तिच्या या ड्रेसची किंमत पाहून अनेकजण हैराण झाले होते. नोट्स ऑन फॅशन थीमनुसार आपला लूक स्टाईल करण्यासाठी प्रियंकाने या ड्रेसवर ४५ लाख रुपये खर्च केले होते. हा ड्रेस बनवण्यासाठी १५०० तास लागले होते. सिल्व्हर रंगाचे जिमी चूचे हिल्स प्रियंकाने घातले होते त्याची किंमत २४०३० रुपये आहे. प्रियंकाने चोपर्ड ज्वेलरी घातली होती. ज्यात ८८.८२ कॅरेटची गुलाबी निलम इअरिंग्सची किंमत ४.५१ लाख रुपये आहे.

जसा प्रियंकाचा या ड्रेसमधील फोटो समोर आला तसा लोकांनी तिला ट्रोल करायला सुरूवात केली. कुणी तिला चुडैल म्हटलं तर कुणी भूत.

एका ट्विटरवरील युजरने प्रियंकाचे दोन फोटो शेअर करत लिहिले की, शेतकऱ्यांना एक नवीन घाबरलेला कावळा मिळाला आहे. तर एका युजरने तिच्या केसांची तुलना वीरप्पनच्या मिशीसोबत केली होती.

टॅग्स :प्रियंका चोप्रामेट गाला