Join us

Bold Photoshoot :  प्रियंका चोप्रा पुन्हा कपड्यांवरून झाली ट्रोल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2019 13:56 IST

अभिनेत्री प्रियंका चोप्रा सतत ग्लोबल इव्हेंट आणि आपल्या विधानांमुळे चर्चेत असते. सध्या पीसी चर्चेत आहे ती तिच्या एका फोटोशूटमुळे. या फोटोशूटमुळे प्रियंका चांगलीच ट्रोल होतेय.

ठळक मुद्देअमेरिकन सिंगर निक जोनाससोबत लग्न झाल्यानंतर प्रियंका सध्या तिचे वैवाहिक आयुष्य एन्जॉय करतेय.

बॉलिवूडसोबत हॉलिवूडमध्येही नावारूपास आलेली अभिनेत्री प्रियंका चोप्रा सतत ग्लोबल इव्हेंट आणि आपल्या विधानांमुळे चर्चेत असते. सध्या पीसी चर्चेत आहे ती तिच्या एका फोटोशूटमुळे. या फोटोशूटमुळे प्रियंका चांगलीच ट्रोल होतेय. काही दिवसांपूर्वीही प्रियंका अशीच ट्रोल झाली होती, मेट गाला इव्हेंटमधील तिचा गेटअप पाहून लोकांनी तिला ट्रोल केले होते. तूर्तास ती ‘इनस्टाईल’ या मॅगझिनसाठी केलेल्या फोटोशूटमुळे ट्रोल होतेय.

या फोटोशूटमध्ये प्रियंकाने साडी नेसलेली आहे. पण या साडीसोबत तिने ब्लाऊज घातलेले नाही. तिचा हा अंदाज चाहत्यांना अजिबात आवडला नाही. म्हणूनच या फोटोशूटचा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर तर चाहत्यांनी नाही-नाही त्या प्रतिक्रिया दिल्या.

प्रियंका देशाचे संस्कार विसरली, असे काहींनी लिहिले. काहींनी तर तिला चांगलेच सुनावले. तू सुंदर दिसतेय. पण साडी शरीर झाकण्यासाठी असते, असे एका चाहत्याने लिहिले. ‘अमीर कपडे न पहने तो फॅशन और गरीब कपडे न पहने तो बेशरम,’अशी उपरोधिक कमेंटही एका युजरने केली.

प्रियंका अशी ट्रोल झालेली पाहून अनेक चाहते तिला पाठींबा देतानाही दिसले. अनेक चाहत्यांना तिचा हा बोल्ड अंदाज भावला.  या फोटोशूटमध्ये पीसी गोल्डन कलरच्या साडीत आहे. न्यूड मेकअप आणि मोकळे केस असा तिचा लूक आहे.

अमेरिकन सिंगर निक जोनाससोबत लग्न झाल्यानंतर प्रियंका सध्या तिचे वैवाहिक आयुष्य एन्जॉय करतेय. निकसोबत ती अनेकदा फिरताना दिसते. कालच प्रियंका भारतात परतली आहे. लवकरच तिचा ‘स्काय इज पिंक’ हा सिनेमा प्रदर्शित होतोय. यात ती फरहान अख्तरसोबत स्क्रिन शेअर करताना दिसेल.

टॅग्स :प्रियंका चोप्रा