Join us  

स्वप्नांपासून...सत्यापर्यंत! पृथ्वीक प्रतापचं स्वप्न सहा महिन्यात झालं पूर्ण, पोस्ट शेअर करत म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2024 11:26 AM

पृथ्वीकने लिहिलेलं कॅप्शन चर्चेत आहे

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या लोकप्रिय कार्यक्रमातील कलाकार पृथ्वीक प्रतापला (Prithvik Pratap) काही दिवसांपूर्वीच म्हाडाचं घर लागलं. त्याने सोशल मीडियावरुन चाहत्यांसोबत ही बातमी शेअर केली होती. याशिवाय पृथ्वीकने एक इच्छाही बोलून दाखवली होती. सहा महिन्यात त्याची ती इच्छा पूर्ण झाली आहे. पृथ्वीकने सोशल मीडियावर खास फोटो पोस्ट करत छान कॅप्शनही दिलं आहे. 

आईवडिलांचं स्वप्न जेव्हा मुलं पूर्ण करतात तेव्हा जो आनंद असतो तो काही औरच असतो. मुंबईत घर घेण्याचं अनेकांचं स्वप्न आहे. अभिनेता पृथ्वीक प्रतापचं ते स्वप्न काही महिन्यांपूर्वीच पूर्ण झालं. आता त्याची आणखी एक इच्छा सहा महिन्यातच पूर्ण झाली आहे. स्वत:च्या पेंटहाऊसमध्ये आईला राणीसारख्या खुर्चीत बसवायचं असं त्याचं स्वप्न होतं. ते त्याने राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत बोलून दाखवलं होतं. आई आणि त्याची पुतणी जाईचा आरामखुर्चीत बसलेला फोटो त्याने पोस्ट केला. तो लिहितो,'स्वप्नांपासून… सत्यापर्यंत..!आजपासून ६ महिन्यांपूर्वी राजश्री मराठीच्या एका मुलाखतीत माझं एक स्वप्न मी जगासमोर बोलून दाखवलं.. तेव्हा कल्पना ही नव्हती की अगदी सहा महिन्यात universe माझ्या प्रयत्नांना योग्य वाट दाखवेल… आज आईला आणि जाईला स्वतःच्या घरात खुश पाहून भरुन पावलोय. तरीही अजून Penthouse आणि Queen’s Throne बाकी आहे. पण साला हार नाही मानणार… कारण मध्यमवर्गीयांची स्वप्न आणि त्यांच्या शर्यती, फक्त बघण्यासाठी नाही पूर्ण करण्यासाठी असतात.'

पृथ्वीकची ही पोस्ट वाचून चाहत्यांनाही त्याचं खूप कौतुक वाटतंय. सर्वच त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत. पृथ्वीक हास्यजत्रेतून अनेकांच्या चेहऱ्यावर हसू आणत आहे. तसंच त्याच्या आईलाही त्याचा खूप अभिमान वाटतोय. पृथ्वीकची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

वर्कफ्रंट

पृथ्वीक प्रताप सध्या महाराष्ट्राची हास्यजत्रामध्ये काम करत आहे. शिवाय त्याचा 'डिलीव्हरी बॉय' हा सिनेमाही प्रदर्शित होतोय. यामध्ये त्याच्यासोबत प्रथमेश परबचीही भूमिका आहे. 'क्लास ऑफ ८३' या हिंदी सिनेमातही पृथ्विक झळकला होता. 

टॅग्स :पृथ्वीक प्रतापमहाराष्ट्राची हास्य जत्राटिव्ही कलाकारमराठी अभिनेतामराठी चित्रपट