Join us

प्रीतीला भोवली सल्लूवरची 'प्रीती'; सलमानला भेटायला तुरुंगात गेली अन् ट्रोल झाली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2018 21:16 IST

सलमानला जोधपूरला भेटण्यासाठी येणारी प्रिती ही पहिलीच सेलिब्रेटी आहे.

जोधपूर - 1998च्या काळवीट शिकारप्रकरणी दोषी ठरविलेल्या अभिनेता सलमान खानला आजची (एप्रिल 6) रात्रही तुरुंगातच काढावी लागणार आहे. सलमान खानच्या जामिनावर आता उद्या (मार्च 7) सकाळी साडेदहाच्या सुमारास सुनावणी होणार आहे. जोधपूर सत्र न्यायालयाने जामिनावरील निर्णय राखून ठेवला असून उद्या त्यावर सुनावणी केली जाईल. त्यामुळे सलमानचं आज तुरुंगात राहणं निश्चित आहे.  सलमान खानला भेटण्यासाठी डिंपल गर्ल प्रीती झिंटा आज सकाळी सेंट्रेल जेलमध्ये पोहचली होती. प्रीती झिंटाला त्यावरुन ट्रोल केलं जात आहे. 

सलमान खान याला काळवीट शिकारप्रकरणी झालेल्या शिक्षेवर त्याच्या चाहत्यांमध्ये आणि काही बॉलिवूड कलाकारांमध्ये नाराजी आहे. सलमान खानच्या घरी कलाकरांची रिघ लागली आहे. सोनाक्षी सिन्हापासून कतरिना कैफ पर्यंत सर्वजण सांत्वन करण्यासाठी सलमान खानच्या घरी येत आहे..  

आज सकाळी सलमानला भेटाण्यासाठी प्रीती झिंटा तुरुंगात पोहोचली होती. प्रितीने चेहऱ्या लपवण्यासाठी डोक्यावर टोपी घातली होती. जेलमधून बाहेर आल्यावर ती सरळ गाडीत जाऊन बसली आणि हॉटेलच्या दिशेने रवाना झाली. पण तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून नेटीझन्सनी टीकेची झोड उडवली आहे. सलमानला जोधपूरला भेटण्यासाठी येणारी प्रिती ही पहिलीच सेलिब्रेटी आहे. ऐवढेच नाही तर काल 'बागी2'ची सक्सेस पार्टीसुद्धा साजिद नाडियाडवालाने रद्द केली होती.  सलमानसोबत त्याच्या दोन्ही बहिणी अलविरा आणि अर्पिता सातत्याने खंबीरपणे उभ्या आहेत. जामिनावरील सुनावणीच्या वेळी देखील त्या हजर होत्या.  

प्रितीने सलमान सोबत अनेक चित्रपटात काम केले आहे. चोरी चोरी चुपके चुपके’, ‘जानेमन’, ‘हीरोज’ आणि‘हर दिल जो प्‍यार करेगा’मध्ये प्रितीने सलमानसोबत अभिनय केला आहे. 

टॅग्स :सलमान खानकाळवीट शिकार प्रकरण