Join us  

पैशांसाठी घाणेरड्या भूमिका करुन देवाजवळ प्रार्थना की..; 'पंचायत' फेम नीना गुप्तांनी सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2024 10:07 AM

सुुरुवातीला पैसे मिळवण्यासाठी मुंबईत काय स्ट्रगल करावा लागला, याचा खुलासा नीना गुप्तांनी एका मुलाखतीत केला. (neena gupta)

सध्या सर्वांना उत्सुकता आहे ती म्हणजे 'पंचायत 3' या वेबसिरीजची. मागचे दोन्ही सीझन गाजवून 'पंचायत 3' साठी जगभरातले प्रेक्षक वाट बघत आहेत. या वेबसिरीजमधील प्रत्येक व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या आवडीच्या. या सीरीजमधील मंजू देवी अर्थात नीन गुप्तांना सुद्धा प्रेक्षकांचं चांगलं प्रेम मिळालं. नीना गुप्तांनी एका मुलाखतीत सुरुवातीच्या आयुष्यातील संघर्षाचा खुलासा केलाय. 

पैशांसाठी केल्या आहेत घाणेरड्या भूमिका: नीना गुप्ता

न्यूज18 शोशाला दिलेल्या मुलाखतीत नीना गुप्तांनी खुलासा केला की, “आज आर्थिक स्थिती चांगली असल्यामुळे माझं आयुष्य बदललं आहे. परंतु करिअरच्या सुरुवातीला पैशांची खूप गरज होती. जास्त पैसे मिळवण्यासाठी खूप वाईट गोष्टी आणि घाणेरड्या भूमिका कराव्या लागल्या. परंतु पुढे तो विशिष्ट पिक्चर रिलीज होऊ नये म्हणून मी अनेकवेळा देवाकडे प्रार्थना करायचे. पण आज मात्र मी अशा वाईट भूमिकांना नाही म्हणू शकते. पूर्वी असं ठामपणे कधीच नाही म्हणू शकले नाही. आज मला जी स्क्रिप्ट आवडते तेच फक्त मी करते, मला जे आवडत नाही ते मी करत नाही."

अनेक वेळा मुंबई सोडून दिल्लीला जाण्याचा विचार केला, पण…: नीना गुप्ता

नीना गुप्ता यांनी पुढे खुलासा करताना म्हणाल्या की, 'मी दिल्लीहून आली होती, त्यामुळे मुंबई हे सुरुवातीला अवघड शहर वाटलं. दर तीन महिन्यांनी मला माझ्या वस्तू पॅक करून परत जावंसं वाटायचं. मी परत जाऊन पीएचडी करेन, अशी इच्छा होती. पण मुंबई हे असं शहर आहे की ते तुम्हाला रोखून ठेवतं. आज रात्री मला उद्या काहीतरी काम मिळेल असं वाटायचं आणि मी स्वतःला थांबवून ठेवायची."

टॅग्स :नीना गुप्तापंचायत समितीबॉलिवूड