Join us
Daily Top 2Weekly Top 5

मंजिरी नथ...! एका नथीला मिळालं मंजिरी ओकचं नाव; बायकोच्या यशाला प्रसादची दाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2022 15:05 IST

एका नथीला बायकोचं नाव मिळाल्यावर नवऱ्याला आनंद होणारचं. हा आनंद Prasad Oakने सोशल मीडियावर शेअर केला आहे

मराठी नाटक, सिनेमा आणि मालिकांमधील दमदार अभिनयानं प्रेक्षकांवर आपली जबरदस्त छाप पाडणारा अभिनेता म्हणजे प्रसाद ओक ( Prasad Oak ). प्रसादला सगळेच ओळखतात. पण तूर्तास बातमी प्रसादबद्दलची नाही  त्याची  पत्नी मंजिरी ओक (Manjiri Oak) हिच्याबद्दल आहे. होय, चक्क एका नथीला मंजिरी ओकचं नाव मिळालंय. ही नथ आता ‘मंजिरी नथ’ म्हणून ओळखली जाणार आहे. 

मंजिरी ही प्रसादसोबत अस्टिस्टंट डायरेक्टर म्हणून काम करते. शिवाय बिझनेस वुमन अशीही तिची ओळख आहे.  सोशल मिडीयावर विविध ब्रँडसोबत कोलॅबोरेशन करून ती छोट्या उद्योजकांना मदत करते. आता तिला तिच्या या निरपेक्ष मदतीचं, हेतूचं फळ मिळालंय.

मंजिरीने स्वत: सोशल मीडियावर ही माहिती दिली आहे. ‘छोट्या छोट्या उद्योजकांना माझ्याकडून छोटीशी मदत व्हावी, या उद्देशानी मी कोलॅबोरेशन सुरू केलं. या निरपेक्ष हेतूंचं फळ म्हणूनच की काय, आज एका नथीला माझं नाव दिलं गेलंय. मंजिरी नथ.... लोकांच्या चेहऱ्यावर आनंद यावा म्हणून मी प्रयत्न केले, करत राहीनच. पण आज माझ्या चेहऱ्यावर आनंद आणि अभिमानही आहे,’अशी पोस्ट मंजिरीने शेअर केली आहे, मंजू, तुझा अभिमान वाटतो...

एका नथीला बायकोचं नाव मिळाल्यावर नवऱ्याला आनंद होणारचं. प्रसादने सोशल मीडियावर हा आनंद व्यक्त केला आहे. ‘प्रिय मंजू आज प्रचंड अभिमान वाटतोय तुझा. छोट्या छोट्या उद्योजकांना छोटीशी मदत व्हावी या निर्मळ उद्देशानी तू हे कोलॅबोरेशन वगैरे सुरु केलंस.या निरपेक्ष हेतूंचं फळ म्हणूनच कि काय...आज एका  नथी ला तुझं नाव लागलंय.  मंजिरीनथ... आपल्या अनेक मित्र मैत्रिणींनी आपल्या पाठीमागे तुझी चेष्टा केली... तुझ्या सो कॉल्ड जवळच्या मैत्रिणींपैकी एकीनेही तुझं कधीही कौतुक केलं नाही. पण या सगळ्या गोष्टींना मागे टाकत...या सगळ्यांच्या नाकावर टिच्चून तू आज स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करते आहेस याचा खूप अभिमान वाटतोय. खूप खूप खूप प्रेम..., अशी पोस्ट प्रसादने शेअर केली आहे.

7 जानेवारी 1998 रोजी प्रसाद आणि मंजिरी लग्नबंधनात अडकले होते. प्रसादचा भाऊ हा मंजिरीचा मित्र होता. मंजिरीला सुद्धा अभिनयाची आवड असल्याने भावाच्या माध्यमातून ती प्रसादच्या अभिनयाच्या कार्यशाळेमध्ये सहभागी झाली होती. साधारण तीन महिने ही कार्यशाळा होती. त्याच काळात हे दोघे एकमेकांच्या जवळ आहे. कुणीही कुणाला प्रपोज केलं नाही. पण दोघंही एकमेकांत गुंतले होते. यानंतर त्यांनी लग्नाचा निर्णय घेत आयुष्याची नवीन सुरुवात केली होती.

टॅग्स :प्रसाद ओक