मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या अध्यात्मिक प्रवासात रमली आहे. १२ ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेतल्यानंतर आता तिने आपला मोर्चा भगवान श्रीकृष्णाकडे वळवला आहे. याबाबत तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे.
प्राजक्ता माळीने भागवत एकादशी आणि तुळशी विवाहाच्या शुभ मुहूर्तावर तिने 'भगवद्गीता' वाचायला सुरुवात केली आहे. याबद्दलची पोस्ट तिने सोशल मीडियावर शेअर केली आहे. तिने "ॐ नमो भगवते वासूदेवाय…! श्री कृष्णार्पणमस्तू!" असे कॅप्शन देत पोस्टमध्ये लिहिले की, "शिवभक्ती आणि १२ ज्योतिर्लिंगांच्या दर्शनानंतर आता तिची वाटचाल भगवान वासूदेवांकडे सुरू झाली आहे. याआधी थोडक्यात भगवद्गीता वाचली होती, पण पूर्ण वाचायला थोडा वेळ लागला, तरी 'देर आए, दुरुस्त आए'."
यासोबत तिने 'महावतार नरसिंह' पाहिल्याचे आणि सध्या नेटफ्लिक्सवर 'कुरूक्षेत्र' ही वेब सीरिज बघत असल्याचे सांगितले आहे, ज्यामुळे तिचे विष्णू अवतारांवरील प्रेम दिसून येते. तिच्या या अध्यात्मिक प्रवासात सोशल मीडियावरील चाहते किती सहभागी आहेत, हे जाणून घेण्याची इच्छाही तिने व्यक्त केली आहे.
वर्कफ्रंटअभिनय, नृत्य, सूत्रसंचालन, कवयित्री आणि व्यावसायिक अशा विविध भूमिका प्राजक्ता माळी यशस्वीपणे पार पाडत आहे. सध्या ती सोनी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय विनोदी कार्यक्रम 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'चे सूत्रसंचालन करत आहे. अभिनयाच्या क्षेत्रात तिने नुकतेच निर्माती म्हणून 'फुलवंती' या चित्रपटाद्वारे पदार्पण केले. 'फुलवंती'मध्ये तिने मुख्य भूमिकाही साकारली आहे. याव्यतिरिक्त, ती 'चिकी चिकी बुबूम बूम' सारख्या चित्रपटांमध्येही दिसली आहे. तसेच, तिचा 'प्राजक्तराज' नावाचा दागिन्यांचा ब्रँडही लोकप्रिय आहे.
Web Summary : Actress Prajakta Mali, after visiting 12 Jyotirlingas, has now turned to Lord Krishna, starting Bhagavad Gita reading. She shared her spiritual journey on social media, expressing her love for Vishnu avatars and engaging with her fans.
Web Summary : अभिनेत्री प्राजक्ता माळी, 12 ज्योतिर्लिंगों के दर्शन के बाद, अब भगवान कृष्ण की ओर मुड़ी हैं, भगवद् गीता का पाठ शुरू कर रही हैं। उन्होंने सोशल मीडिया पर अपनी आध्यात्मिक यात्रा साझा की, विष्णु अवतारों के लिए अपना प्रेम व्यक्त किया और अपने प्रशंसकों के साथ जुड़ीं।