Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्रभासच्या चाहत्यांनो, या तारखेला येणार ‘शेड्स ऑफ साहो 2’ !!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2019 16:00 IST

साऊथ सुपरस्टार प्रभास याच्या ‘साहो’ या आगामी चित्रपटाकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत. आता ‘साहो’कडे डोळे लावून बसलेल्या चाहत्यांसाठी एक खास खबर आहे.

ठळक मुद्दे सुजीत यांनी दिग्दर्शित या चित्रपटात श्रद्धा कपूरशिवाय नील नितीन मुकेश, जॅकी श्रॉफ, मंदिरा बेदी, चंकी पांडे, महेश मांजरेकर यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

साऊथ सुपरस्टार प्रभास याच्या ‘साहो’ या आगामी चित्रपटाकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत. ‘बाहुबली2’नंतर प्रभासचा कुठलाही चित्रपट प्रदर्शित झालेला नाही. त्यामुळेही ‘साहो’ बद्दल लोकांच्या मनात प्रचंड उत्सुकता आहे. आता ‘साहो’कडे डोळे लावून बसलेल्या चाहत्यांसाठी एक खास खबर आहे. होय, ‘शेड्स ऑफ साहो’ला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर  या चित्रपटाचे मेकर्स ‘शेड्स ऑफ साहो’चा सेकंड पार्ट घेऊन येणार आहेत. येत्या ३ मार्चला ‘शेड्स ऑफ साहो2’ प्रदर्शित केला जाईल. गत २२ आॅक्टोबरला प्रभासच्या वाढदिवसाच्या मुहूर्तावर मेकर्सनी ‘शेड्स ऑफ साहो’चा व्हिडीओ जारी केला होता. त्याचवेळी ‘शेड्स ऑफ साहो’अशा सीरिजअंतर्गत असे आणखी व्हिडिओ  रिलीज करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. त्यानुसार, येत्या ३ मार्चला ‘शेड्स ऑफ साहो 2’ रिलीज होणार आहे.

‘शेड्स ऑफ साहो’ हा प्रामुख्याने ‘साहो’चा मेकिंग व्हिडिओ आहे. ‘शेड्स ऑफ साहो’चा पहिला व्हिडीओ पाहिल्यानंतर लोक अक्षरश: क्रेजी झाले होते. व्हिडिओत प्रभाससोबत श्रद्धा कपूरची थरारक स्टंट्स करतानाची झलकही दिसली होती. अ‍ॅक्शन आणि थ्रीलरने भरलेला हा  व्हिडिओ अपलोड केल्याच्या काही मिनिटांतच लाखो लोकांनी पाहिला होता. त्यामुळे ‘शेड्स ऑफ साहो 2’वर लोकांच्या किती उड्या पडतात, ते बघूच.‘साहो’मध्ये प्रभास एका गुप्तहेराच्या भूमिकेत आहे़  तेलगू, तामिळ आणि हिंदी अशा तीन भाषांमध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.  सुजीत यांनी दिग्दर्शित या चित्रपटात श्रद्धा कपूरशिवाय नील नितीन मुकेश, जॅकी श्रॉफ, मंदिरा बेदी, चंकी पांडे, महेश मांजरेकर यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.  

टॅग्स :प्रभास