Join us
Daily Top 2Weekly Top 5

'Saaho' च्या नव्या पोस्टरमध्ये दिसला प्रभास आणि श्रद्धाचा रोमाँटिक अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2019 13:44 IST

बाहुबली फेम प्रभास आणि श्रद्धा कपूरचा साहो गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी सिनेमाचा टीझर आणि पहिले गाणं आऊट झाले आहे.

बाहुबली फेम प्रभास आणि श्रद्धा कपूरचासाहो गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी सिनेमाचा टीझर आणि पहिले गाणं आऊट झाले आहे. 'साहो'ची वाट फॅन्स मोठ्या आतुरतेने बघतायेत. साहोचे नवे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. प्रभासने त्याच्या सोशल मीडियावर अकाऊंटवरुन हे पोस्टर शेअर केले आहे. 

या पोस्टरमध्ये प्रभास आणि श्रद्धा एकमेकांच्या डोळ्यात-डोळे घालून बघताना दिसतायेत. पोस्टरमधून प्रभास आणि श्रद्धाची केमिस्ट्र दिसतेय. पहिल्यांदा प्रभास आणि श्रद्धा एकत्र स्क्रिन शेअर करत आहेत. या पोस्टरवर साहोची बदलेली रिलीज डेटदेखील दिसतेय. 'साहो'  आधी 15 ऑगस्टला रिलीज होणार होता  मात्र आता 30 ऑगस्टपर्यंत प्रेक्षकांना याची वाट पाहावी लागणार आहे. रिपोर्टनुसार 15 ऑगस्टला शारवानंद स्टारर 'रानारंगम' आणि अदिवि शेषचा सिनेमा 'इवारु' रिलीज होतोय त्यामुळे साहोची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे.  

'साहो'बाबत बोलायचे झाले तर त्यात दमदार अॅक्शन सीन्स बघायला मिळणार आहेत. एक अॅक्शन शूट करण्यासाठी जवळपास 70 कोटींचा खर्च करण्यात आला आहे. प्रभास त्याच्या या सिनेमासाठी चांगलीच मेहनत घेतली आहे. सिनेमाचे दिग्दर्शक सुजीत ही प्रत्येक अ‍ॅक्शन सीनकडे बारकाईने लक्ष दिले आहे. प्रत्येक सीनमध्ये प्रभास अतिशय प्रभावशाली दिसला पाहिजे यासाठी ते प्रयत्न करत आहेत.साहो हा सिनेमा भारतातील पहिला बहुभाषी चित्रपट असून एकाच वेळी हिंदी, तेलगू आणि तमिळ या भाषांमध्ये हा शूट केला गेला आहे. या चित्रपटात प्रभाससोबतच श्रद्धा कपूर, नील नीतिन मुकेश, जॅकी श्रॉफ, मंदिरा बेदी यांच्या मुख्य भूमिका आहेत.

टॅग्स :साहोप्रभासश्रद्धा कपूर