Join us  

'रंगीला गर्ल' उर्मिला मातोंडकरच्या चाहत्यांसाठी गुडन्यूज, लवकरच सिनेसृष्टीत करणार कमबॅक

By ऑनलाइन लोकमत | Published: February 04, 2024 9:07 AM

 मराठमोळी उर्मिला मातोंडकर ही बॉलिवूडमधील 90 च्या दशकातील सर्वात यशस्वी अभिनेत्री आहे.

 मराठमोळी उर्मिला मातोंडकर ही बॉलिवूडमधील 90 च्या दशकातील सर्वात यशस्वी अभिनेत्री आहे. आज बॉलिवूडची 'रंगीला गर्ल' आपला 50 वा वाढदिवस साजरा करत आहे. बाल कलाकार म्हणून करिअरला सुरूवात करणाऱ्या उर्मिलाने खूप कमी काळात इंडस्ट्रीत आपली वेगळी ओळख निर्माण केली. तेलुगू, तमिळ, मल्याळम आणि मराठी चित्रपटांमध्ये काम करून आपला ठसा उमटवला आहे. आता एका मोठ्या ब्रेकनंतर उर्मिला   सिनेसृष्टीत कमबॅक करण्यासाठी सज्ज झाली आहे. 

 'तिवारी' या आगामी वेबसीरिजमधून उर्मिला मातोंडकर ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण करणार आहे. उर्मिला यात स्टाईलमध्ये ॲक्शन करताना दिसणार आहे. यामध्ये फक्त उर्मिला मातोंडकर मुख्य भूमिकेत असून तिची भूमिका अतिशय दमदार आणि आव्हानात्मक आहे. 'तिवारी' ही वेबसीरिज भावनिक असून यात ड्रामा, अ‍ॅक्शन, थ्रिलर आणि ट्विस्ट पाहायला मिळणार आहेत. आई आणि मुलीच्या भावनिक नात्यावर ही सीरिज आधारित आहे. या मालिकेचे दिग्दर्शन सौरभ वर्मा यांनी केले आहे. तर ही सीरिज यावर्षी प्रदर्शित होणार असल्याचं म्हटलं जात आहे. पण, अधिकृत तारिख जाहीर करण्यात आलेली नाही. 

उर्मिलाचा 2008 मध्ये प्रदर्शित झालेला 'ईएमआय' हा आघाडीची अभिनेत्री म्हणून शेवटचा चित्रपट होता. यानंतर तिने चित्रपटांमध्ये छोटे-छोटे कॅमिओ केले, पण तिला मुख्य नायिका म्हणून एकही चित्रपट मिळाला नाही.  उर्मिला सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती तिचे नव-नवीन फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. आता 16 वर्षांनंतर उर्मिलाला ओटीटीच्या माध्यमातून पुन्हा ती प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.  

टॅग्स :उर्मिला मातोंडकरसेलिब्रिटीसिनेमाबॉलिवूड