Join us
Daily Top 2Weekly Top 5

पूजा ‘त्या’ वेळी नव्हती नर्व्हस!

By admin | Updated: August 14, 2016 03:28 IST

पू जा हेगडे आणि हृतिक रोशन हे सध्या ‘मोहेंजोदडो’ चित्रपटामुळे चर्चेत आहेत. हृतिकने एका मुलाखती सांगितले होते की, पूजाच्या अभिनयात एक वेगळीच शुद्धता, सात्विक

पू जा हेगडे आणि हृतिक रोशन हे सध्या ‘मोहेंजोदडो’ चित्रपटामुळे चर्चेत आहेत. हृतिकने एका मुलाखती सांगितले होते की, पूजाच्या अभिनयात एक वेगळीच शुद्धता, सात्विक, साधेपणाचे भाव आहेत, जे इतर अभिनेत्रींमध्ये क मी पाहावयास मिळतात.’ जेव्हा हृतिकचे बोल पूजाने ऐकले, तेव्हा तिला विश्वासच बसला नाही की, एवढा मोठा कलाकार आपल्याविषयी असे बोलतोय. हृतिकची नायिका म्हणून निवड करण्यात आल्याची बातमी जेव्हा तिला मिळाली, तेव्हा तिला याचे आश्चर्य वाटले की, हृतिकसारख्या बड्या कलाकारासोबत काम करण्याची आपल्याला संधी मिळावी. पूजा-हृतिक यांच्यातील किसिंग सीनविषयी विचारले असता, ती म्हणाली, ‘आमच्या दोघांमध्ये एक फ्रेंडली रिलेशन तयार झाले होते. ज्यामुळे मला किसिंग सीनवेळी अजिबात नर्व्हसनेस वाटत नव्हता. आम्ही दोन वर्षांपासून एकमेकांसोबत या चित्रपटासाठी शूटिंग करीत होतो, त्यामुळे एकमेकांसोबत आम्ही जास्त कम्फर्टेबल झालो होतो.’