पूजा सावंतने मराठी चित्रपटसृष्टीसोबतच बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाची छाप उमटविली आहे. क्षणभर विश्रांती या सिनेमातून मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं. यानंतर आता गं बया, झकास, सतरंगी रे, दगडी चाळ, नीळकंठ मास्तर अशा अनेक मराठी सिनेमात वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. विविध सिनेमांमधून दर्जेदार भूमिका साकारत चित्रपटसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
पूजा सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच फॅन्सच्या संपर्कात असते. आपले फोटो आणि व्हिडीओ ती त्यांच्यासह शेअर करत असते. ज्यात ती खूपच बोल्ड आणि ग्लॅमरस दिसते आहे.
काही दिवसांपूर्वी पूजाने तिचा ट्रेडिशनल लूकमधला फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटो पूजाचा खूप सिंपल आणि सोबर लूक दिसतोय. फोटोतला हा लूक पूजाच्या साधासरळ अंदाज फॅन्सना चांगलाच भावला आहे. लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव तिच्या फोटोवर करण्यात आला आहे. या फोटोला पूजाने कॅप्शनदेखील दिले आहे. ज्यात तिने तिच्या चहेऱ्यावर हास्य फुलवणाऱ्या तिच्या आयुष्यातील लोकांचे आभार मानले आहेत.
पूजा सावंतने मराठी चित्रपटसृष्टीसोबतच बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाची छाप उमटविली आहे. काही महिन्यांपूर्वी पूजाने बॉलिवूडमध्ये देखील पदार्पण केले आहे. 'जंगली' सिनेमात तिने शंकराची भूमिका बजावली असून ती महिला माहूत होती. तिच्या या भूमिकेचे देखील सर्वत्र कौतुक झाले होते.