Join us

“घरी बसलेय, काम नाहीये...”, 12 वर्षांपासून इंडस्ट्रीत असलेली ‘ही’ अभिनेत्री झालीये बेरोजगार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2023 11:22 IST

1 / 10
टॅलेंट असूनही अनेकदा काम मिळत नाही. आम्ही बोलतोय ते एंटरटेनमेंट इंडस्ट्रीच्या स्टार्सबद्दल, ज्यांच्याकडे सध्या काम नाहीये. आंचल सिंह ही अशीच एक अभिनेत्री.
2 / 10
होय, कधीकाळी टीव्ही इंडस्ट्रीचा लोकप्रिय चेहरा असलेल्या आंचल सिंह हिच्याकडे सध्या काम नाहीये. अनेक महिन्यांपासून ती बेरोजगार आहे.
3 / 10
आंचलने एक-दोन नाहीतर तब्बल 12 वर्षे इंडस्ट्रीत काम केलं. पण ती आज बेरोजगार झाली. एक पोस्ट शेअर करत तिनं ही खंत व्यक्त केली आहे.
4 / 10
गेल्या 6 महिन्यांपासून आंचल कामाच्या शोधात आहे पण तिला काम मिळत नाहीये. आंचलने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक पोस्ट शेअर करत व्यथा सांगितली आहे.
5 / 10
आंचलने तिच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, ‘दररोज लोक मला विचारतात की मी काय करते आहे किंवा मी राउंडटेबल्सचा भाग का नाही किंवा मला माझ्या कामासाठी नामांकित का केलं जात नाही? ज्यांना या सगळ्यामध्ये रस आहे, त्यांच्यासाठी...
6 / 10
पुढे ती लिहिते, गेल्या सहा महिन्यांपासून मला जास्तीत जास्त दोनवेळा वगळता कोणत्याही चित्रपट किंवा वेब सीरिजसाठी आॅडिशन देण्यास बोलावण्यात आलं नाही. मी फोन करून चौकशी केली तेव्हा मला सांगण्यात आलं की सध्या कोणतंही काम होत नाहीये....
7 / 10
ती पुढे म्हणाली कि, मी माझ्या आयुष्यातील 12 वर्षे इंडस्ट्रीला दिली आहेत आणि 400 टीव्ही जाहिराती केल्या आहेत. मी पंजाबी, तमिळ आणि श्रीलंकन चित्रपटांमध्ये काम केले आहे, त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक पुरस्कार मिळाले आहेत. अशातच, मी स्वत:हून काही चित्रपट सोडले.
8 / 10
2022 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘ये काली काली आंखे’ मुळे मला खरी ओळख मिळाली. पण आता माझ्याकडे काम नहीये.. सत्य कडू असतं. पण एवढं करूनही मी घरी बसून आहे. माझ्यायाकडे काम नाही. या गोष्टीचा मला त्रास होतो आणि मी निराश होते, असं तिने म्हटलं आहे.
9 / 10
5 एप्रिल 1992 रोजी जन्मलेल्या आंचल सिंगने तिच्या करिअरची सुरुवात मॉडेलिंगपासून केली. आंचल जवळपास 12 वर्षांपासून इंडस्ट्रीत काम करत आहे
10 / 10
आंचलने 400 हून अधिक जाहिरातींमध्ये काम केले आहे. आंचल सिंग या वर्षी दोन वेबसीरिजमध्ये दिसली आहे. ‘ये काली काली आंखे’ ही तिची वेबसीरिज प्रचंड गाजली. आंचल सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. इंस्टाग्रामवर आंचलचे 2 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.
टॅग्स :टिव्ही कलाकारसेलिब्रिटी