Join us  

कुठे गायब झाली 'साकी साकी गर्ल' ? ६ महिने काढले तुरुंगात तर बॉयफ्रेंडनेही केले अतोनात हाल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 08, 2024 12:09 PM

1 / 8
कोयना मित्रा आठवते का तुम्हाला? साकी साकी या गाण्यामुळे ही अभिनेत्री प्रचंड लोकप्रिय झाली होती. त्यामुळेच साकी साकी गर्ल या नावानेही ती इंडस्ट्रीत ओळखली जायची.
2 / 8
कोयना तिच्या फिल्मी लाइफपेक्षा पर्सनल आयुष्यामुळे जास्त चर्चेत आली. तिच्या बॉयफ्रेंडने तिला प्रचंड शारीरिक आणि मानसिक त्रास दिला होता. ज्यामुळे ती चर्चेचा विषय ठरली होती.
3 / 8
कोयना मध्यंतरी बिग बॉस या रिअॅलिटी शोमध्ये झळकली होती. या कार्यक्रमात तिने तिच्या पर्सनल आयुष्याविषयी अनेक खुलासे केले. परंतु, या शो नंतर ती पुन्हा गायब झाली. त्यामुळे सध्या ती काय करते, कशी दिसते असे प्रश्न नेटकऱ्यांना पडतात.
4 / 8
कोयनाने मॉडलिंगपासून तिच्या करिअरची सुरुवात केली. कॉलेजमध्ये शिकत असतानाच तिला मॉडलिंगच्या ऑफर्स येत होत्या. त्यानंतर ती एका म्युझिक अल्बममध्ये झळकली आणि रातोरात लोकप्रिय झाली.
5 / 8
रामगोपाल वर्मा यांच्या मुसाफिर या सिनेमातून कोयनाला पहिला ब्रेक मिळाला. या सिनेमामुळे ती लोकप्रिय झाली. मात्र, २००८ नंतर ती अचानक इंडस्ट्रीतून बाहेर पडली.
6 / 8
२०१५ मध्ये कोयना एका सिनेमात ती दिसली होती. मात्र, पुन्हा इंडस्ट्रीतून गायब झाली. त्यानंतर २०१९ मध्ये ती बिग बॉसमध्ये झळकली. सध्या कोयना लॉस एंजलीसमध्ये स्थायिक असून सोशल मीडियावर सक्रीय आहे.
7 / 8
कोयना अनेक वादविवादांमुळे चर्चेत राहिली. २०१३ मध्ये चेक बाऊन्स झाल्या प्रकरणी तिला ६ महिन्यांच्या तुरुंगवासाचीही शिक्षा मिळाली होती. तसंच कोर्टाने तिला ४.६४ लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याचेही आदेश दिले होते. मात्र, कोयनाने हे आरोप फेटाळून लावले.
8 / 8
कोयना तिच्या एक्स बॉयफ्रेंडमुळेही चर्चेत आली होती. तिचा प्रियकर जास्तच पझेसिव्ह असल्यामुळे त्याने तिच्यावर मानसिक अत्याचार केले. सतत लग्नासाठी दबाव टाकणे, बाथरुममध्ये बंद करुन ठेवणे असे प्रकार त्याने केले.
टॅग्स :कोएना मित्राबॉलिवूडसिनेमाबिग बॉस