Join us  

कुणी पनवती म्हटलं तर कुणी मागितली कुंडली, बॉलिवूडची 'ती' सुपरस्टार अभिनेत्री कुणासमोर नाही हरली

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2023 11:55 AM

1 / 10
बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन(Vidya Balan)ने परिणीती(Parineeta) सिनेमातून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. १८ वर्षांपूर्वी रिलीज झालेल्या या सिनेमात विद्यासोबत संजय दत्त, सैफ अली खान, रायमा सेन आणि दीया मिर्झासारखी दमदार स्टारकास्ट होती. (फोटो इन्स्टाग्राम)
2 / 10
शरद चंद्र चटोपाध्याय यांची बंगाली कांदबरीवर आधारित हा सिनेमा होता. मजेशीर गोष्ट म्हणजे आपल्या डेब्यू सिनेमासाठी विद्या बालनला चक्क ६० वेळा स्क्रिन टेस्ट द्यावी लागली होती. (फोटो इन्स्टाग्राम)
3 / 10
आता मोठ्या ब्रेकनंतर विद्या अनु मेनन यांच्या 'नीयत' सिनेमातून कमबॅक करतेय. या सिनेमाला हिट करण्याच्या दृष्टीने ती जोरदार प्रमोशन करतेय. (फोटो इन्स्टाग्राम)
4 / 10
विद्याने आपल्या करिअरमध्ये बॉलिवूडसोबतच साऊथ सिनेमांमध्ये देखील काम केलं आहे. तिने आपल्या करिअरची सुरुवात टीव्ही शोमधून केली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, टीव्हीनंतर विद्या साऊथ सिनेमांकडे वळली होती. (फोटो इन्स्टाग्राम)
5 / 10
साऊथचे सुपरस्टार मोहनलाल यांच्यासोबत ती आपल्या करिअरची सुरुवात करणार होती. मात्र काही कारणांमुळे हा सिनेमा होऊ शकला नाही. विद्याला धक्का बसला जेव्हा हा सिनेमा थांबला आणि यानंतर लोकांनी तिला पनवती म्हणायला सुरुवात केली. (फोटो इन्स्टाग्राम)
6 / 10
विद्याच्या आयुष्यात एक काळ तर असा होता की, निर्माते तिला ‘पनवती’ समजायचे. काही निर्मात्यांनी तर केवळ विद्या चित्रपटात काम करीत असल्याने ते चित्रपट रिलीज होऊ दिले नाहीत. (फोटो इन्स्टाग्राम)
7 / 10
कारकिर्दीच्या सुरुवातीला विद्याने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत भाग्य आजमावायचे ठरवले. दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेता मोहनलालसोबत ‘चक्रम’ या चित्रपटात तिला संधी मिळालीही. या चित्रपटानंतर तिने तब्बल 12 सिनेमे साईन केलेत. पण काही कारणास्तव ‘चक्रम’चे चित्रीकरण सतत पुढे ढकलले गेले. (फोटो इन्स्टाग्राम)
8 / 10
मोहनलालने साऊथमध्ये अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याच्या करियरमध्ये कोणताच चित्रपट डिले झाला नव्हता. ‘चक्रम’ डिले झाला आणि त्याचे सगळे खापर विद्याच्या डोक्यावर फोडण्यात आले. निर्मात्यांनी तर विद्याला कमनशिबी ठरवून टाकले. त्यानंतर या चित्रपटातून विद्याची हकालपट्टी झाली. मोहनलालने देखील या चित्रपटात काम करण्यास नकार दिला. (फोटो इन्स्टाग्राम)
9 / 10
निर्मात्यांनी दुसरे कलाकार घेऊन हा चित्रपट पूर्ण केला. या चित्रपटानंतर विद्याच्या हातून तिने साईन केलेले 12 चित्रपटही गेलेत. (फोटो इन्स्टाग्राम)
10 / 10
विद्याने त्याकाळी अनेक बंगाली चित्रपटांमध्ये काम केले. परंतु विद्या या चित्रपटात असल्यामुळे प्रेक्षक त्यास स्वीकारणार नाहीत, या भीतीपोटी तिचे हे चित्रपट रिलीजच होऊ गेले नाहीत. त्यानंतर तर असा समज पुढे आला की, जो कोणी विद्यासोबत काम करणार त्याला नक्कीच तोटा सहन करावा लागणार. (फोटो इन्स्टाग्राम)
टॅग्स :विद्या बालनसेलिब्रिटीTollywood