1 / 9बॉलिवूडचा किंगखान शाहरूख खान याची वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही. देशातच नाही तर जगभर त्याचे चाहते आहेत. आजही त्याची क्रेझ कायम आहे. अनेकांना त्याची कहाणी तशी माहिती आहेच. पण एक गोष्ट कदाचित माहित नसावी...!2 / 9होय, 9 वर्षांपूर्वी शाहरूखने अशी काही इच्छा व्यक्त केली होती की, सगळ्यांना धक्का बसला होता. फॅन्सचं तर डोकं चक्रावलं होतं. मी आधीपासून एक पॉर्न स्टार बनू इच्छित होतो, असं शाहरूख म्हणाला होता.3 / 9मला कायम पॉर्न स्टार बनायचं होतं. मला अॅडल्ट फिल्म्समध्ये काम करायचं होतं, असं शाहरूख म्हणाला होता. इतका मोठा स्टार असलेल्या शाहरूखनं असं का म्हणावं? हे अनेकांच्या समजण्यापलीकडे होतं. पण यामागे एक इंटरेस्टिंग कारण होतं.4 / 92013 साली शाहरूखने पॉर्न स्टार बनण्याची इच्छा व्यक्त केली होती. मी पॉर्न स्टार बनण्यासाठी अगदी निष्ठेनं काम केलं असतं, असंही शाहरूख म्हणाला होता. त्याच्या मनात पॉर्न स्टार बनण्याची इच्छा कशी निर्माण झाली ते सुद्धा त्याने सांगितलं होतं.5 / 9तर त्यामागचं कारण होता हॉलिवूड सुपरस्टार सिल्वेस्टर स्टेलोन. पॉर्न स्टार बनण्याची प्रेरणा कुठून घेतली? असं विचारलं असता, मी सिल्वेस्टर स्टेलोनचा मोठा चाहता आहे. तो हॉलिवूड सुपरस्टार बनण्याआधी एक अॅडल्ट फिल्म स्टार होता. जगातील सर्वात मोठा पॉर्न स्टार बनल्यानंतर मी माझा झेंडा अमेरिकेत फडकवला असता, असं तो म्हणाला होता.6 / 9सिल्वेस्टर 1970 मध्ये पहिल्या अॅडल्ट मुव्हीमध्ये दिसला होता. त्याला अपार्टमेंटमधून हाकलून दिल्यामुळे तो बेघर झाला होता. तीन आठवडे बस टर्मिनलवर झोपण्याची वेळ त्याच्यावर आली होती आणि अगतिकतेपोटी त्याने ही अॅडल्ट मुव्ही केली होती.7 / 9शाहरूख खानच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर लवकरच त्याचा ‘पठान’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. या चित्रपटात शाहरूखसोबत दीपिका पादुकोण मुख्य भूमिकेत आहेत.8 / 9साऊथ दिग्दर्शक एटलीच्या एका सिनेमातही शाहरूख झळकणार आहे. या चित्रपटाचं नाव अद्याप गुलदस्त्यात आहेत. पण या शाहरूख डबल रोलमध्ये असणार असल्याचं कळतंय.9 / 9शाहरूख पहिल्यांदा राजकुमार हिरानीसोबत काम करणार आहे. राजकुमार हिराणींच्या ‘डंकी’ या चित्रपटात शाहरूखची वर्णी लागली आहे. त्याच्यासोबत तापसी पन्नू स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे.