Join us  

‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ ते ‘मडगांव एक्सप्रेस’, वीकेंड होणार धमाकेदार, OTTवर प्रदर्शित होणार बिग बजेट सिनेमे

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2024 12:43 PM

1 / 7
वीकेंडला ओटीटीवर काय पाहायचं? हा प्रश्न नेहमीच आपल्याला पडतो. पण, प्रेक्षकांनो तुमचा हा वीकेंड मात्र एकदम धमाकेदार होणार आहे.
2 / 7
कारण, बॉक्स ऑफिस गाजवलेले बहुप्रतीक्षित सिनेमे यंदाच्या वीकेंडला ओटीटीवर पाहायला मिळणार आहेत.
3 / 7
'स्वातंत्र्यवीर सावरकर' ते 'मडगांव एक्सप्रेस' हे काही महिन्यांपूर्वीच प्रदर्शित झालेले सिनेमे ओटीटीवर येणार आहेत.
4 / 7
वीर सावरकर यांची जीवनगाथा सांगणारा 'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमा १७ मेला ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. हा सिनेमा zee5 वर पाहता येईल.
5 / 7
मार्च महिन्यात प्रदर्शित झालेला 'मडगांव एक्सप्रेस'देखील शुक्रवारी डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित करण्यात येणार आहे. या सिनेमात कुणाल खेमू, अविनाश तिवारी, दिव्येंदू शर्मा आणि नोरा फतेही मुख्य भूमिकेत आहेत.
6 / 7
अदा शर्मा मुख्य भूमिकेत असलेला 'बस्तर द नक्सल स्टोरी' १७ मेला ओटीटीवर रिलीज होणार आहे. हा सिनेमा zee5 वर पाहता येईल.
7 / 7
विकी कौशल आणि सारा अली खान मुख्य भूमिकेत असलेला 'जरा हटके जरा बचके' हा सिनेमाही १७ मेला जिओ सिनेमावर रिलीज होणार आहे. ११ महिन्यांनी हा सिनेमा ओटीटीवर येत आहे.
टॅग्स :रणदीप हुडासिनेमा