'पंचायत' ते 'द फॅमिली मॅन'; 'या' वेब सिरीजनी गाजवलं यंदाचं वर्ष; OTT वर आहेत उपलब्ध, तुम्ही पाहिल्यात का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 17:36 IST
1 / 7OTT च्या बदलत्या जगात टिकून राहणं ही प्रत्येकासाठी मोठं आव्हान आहे. प्रेक्षकांची बदलती आवड, वाढता खर्च आणि व्ह्यूअरशिपचा दबाव यामुळे अनेक वेब शोज दुसऱ्या सीझनपर्यंतही पोहोचत नाहीत.2 / 7अशा परिस्थितीत एखादा शो तिसऱ्या सीझनपर्यंत किंवा त्याहून पुढे जातो, याचा अर्थ तो सातत्याने लोकप्रिय राहिला, त्याची दमदार कथा आणि प्रेक्षकांचा मिळणारा पाठिंबा हेही त्याचं प्रमुख कारण असतं. अशाच या वेब सीरिज ओटीटी प्रेमींची मनं जिंकण्यात यशस्वी ठरल्या.3 / 7ग्रामीण भारताच्या पार्श्वभूमीवर घडणारी, साध्या रोजच्या जीवनावर आधारित हलकीफुलकी मालिका म्हणून सुरू झालेली पंचायत आज देशातील सर्वाधिक आवडत्या वेब फ्रँचायझींपैकी एक ठरली आहे. नैसर्गिक पात्रे, निवांत विनोद आणि भावनिक उब यामुळे या शोने दाखवून दिले की भव्य सेट्स किंवा नाट्य नसलं तरी मन जिंकता येतं. मजबूत कथा आणि उत्कृष्ट वर्ड-ऑफ-माउथमुळे हा शो सलग अनेक सीझन्सपर्यंत पोहोचला, आणि प्रत्येक सीझनसोबत फुलेरा व प्रेक्षकांमधील नातं अधिक घट्ट झालं. पंचायत सीरिजचा प्रत्येक भाग तुम्ही अॅमेझॉन प्राीमवर पाहू शकता.4 / 7मास अपील आणि कल्ट स्टेटसच्या बाबतीत मिर्झापूरशी तुलना होईल असे शोज फारसे नाहीत. सत्तासंघर्ष, लक्षात राहणारी पात्रं आणि दमदार डायलॉग्जमुळे हा क्राइम ड्रामा पाहता पाहता पॉप-कल्चर फेनॉमेनन बनला. तिसऱ्या सीझनपर्यंत पोहोचणं हीच गोष्ट पुरेशी आहे हे सांगण्यासाठी की त्याची कथा आजही तितकीच प्रभावी आहे आणि प्रेक्षकांची उत्सुकता अजूनही तितकीच जिवंत आहे.5 / 7गुप्तहेरगिरी आणि कौटुंबिक आयुष्य यांचा समतोल राखणं अवघड असतं, पण द फॅमिली मॅनने हा फॉर्म्युला अप्रतिमरीत्या साधला. अॅक्शन, विनोद, उपरोध आणि भावनिक कथानक यांचं अनोखं मिश्रण प्रेक्षकांच्या मनाला भिडलं आणि ही मालिका देशातील सर्वाधिक प्रशंसित वेब सिरीजपैकी एक बनली. प्रत्येक पुढील सीझनसोबत वाढणारे दांव आणि अधिक घट्ट होत जाणारे लेखन यामुळे तिची लोकप्रियता कायम टिकली आहे. ही सीरिज अॅमेझॉन प्राईमवर उपलब्ध आहे.6 / 71980 च्या दशकातील उत्तर प्रदेशाच्या पार्श्वभूमीवर आधारित रक्तांचलने सत्ता, राजकारण आणि गुन्हेगारीचं वास्तव रूप थेट आणि प्रभावीपणे मांडून स्वतःची ठसठशीत ओळख निर्माण केली. जमिनीवरची कथा आणि दमदार अभिनयामुळे या शोने एक विश्वासू प्रेक्षक वर्ग तयार केला — ज्यामुळे निर्मात्यांना दोन सीझनच्या पुढे जाण्याचा आत्मविश्वास मिळाला. विजय सिंहच्या भूमिकेत क्रांती प्रकाश झा असलेला तिसरा सीझन सध्या निर्मितीत आहे आणि प्रेक्षक त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.7 / 7 सत्य घटनांवर आधारित दिल्ली क्राईमने आपल्या वास्तववादी सादरीकरणामुळे आणि कायदा व सुव्यवस्थेशी संबंधित कथांच्या संवेदनशील मांडणीमुळे चाहत्यांमध्ये एक वेगळीच क्रेझ निर्माण केली. समीक्षकांची दाद, आंतरराष्ट्रीय मान्यता आणि प्रभावी अभिनयामुळे ही मालिका एका सीझनवरच न थांबता पुढेही वाढत राहिली. प्रत्येक नवा सीझन तिची प्रासंगिकता आणि प्रभाव अधिक ठळक करतो.