Join us

Criminal Justice 4: ‘माधव मिश्रा’ची साधी भोळी पत्नी, खऱ्या आयुष्यात 'फॅशन क्वीन' आहे खुशबू अत्रे ( PHOTOS )

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2025 17:38 IST

1 / 9
'क्रिमिनल जस्टिस' वेब सिरिजमधील पंकज त्रिपाठी यांची वकील माधव मिश्रा ही भूमिका आणि पत्नी रत्ना मिश्रा हिच्याशी असलेली गमतीशीर केमिस्ट्री चर्चेत आहे.
2 / 9
'क्रिमिनल जस्टिस'मध्ये वकील माधव मिश्रा यांची पत्नी रत्नाच्या भूमिकेत दिसणारी अभिनेत्री खुशबू अत्रे हिच्याही भूमिकेचे कौतुक केले जात आहे.
3 / 9
वेबसीरिजमध्ये साधी भोळी दिसणारी रत्ना खऱ्या आयुष्यात मात्र खूपच ग्लॅमरस आहे. तिचे सौंदर्य पाहून तिच्या फोटोंवरून तुमचीही नजर हटणार नाही.
4 / 9
खुशबू अत्रे मुंबईची नाही तर मध्य प्रदेशातील भरवाहाची आहे. खुशबू आज तिच्या दमदार अभिनयासाठी ओळखली जाते, ज्याची सुरुवात तिने नाटकांतून केली.
5 / 9
रंगभूमीनंतर खुशबूने लोकप्रिय मालिका 'पवित्र रिश्ता'द्वारे टीव्हीवर पदार्पण केले. यासोबतच तिने क्राईम पेट्रोलसह अनेक शोमध्ये छोट्या भूमिका केल्या.
6 / 9
टीव्हीवर बराच काळ काम केल्यानंतरही खुशबूला अपेक्षित प्रसिद्धी मिळालेली नव्हती, पण ओटीटी वेब सिरिजने खुशबूचे सारे जगच बदलून टाकले.
7 / 9
ओटीटीवर 'क्रिमिनल जस्टिस'पूर्वी खुशबूने 'मैं एनआरआय बन्ना चाहती हूं' आणि 'अवैध' सारख्या वेब सिरिजमध्ये काम करून वाहवा मिळवली.
8 / 9
'क्रिमिनल जस्टिस' मध्ये, खुशबूने गावाकडच्या एका साध्या भोळ्या मुलीची भूमिका चोख वठवली आहे. परंतु खऱ्या आयुष्यात ती खूप स्टायलिश आहे.
9 / 9
इंस्टाग्रामवर खुशबूचे अनेक बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो आहेत, जे पाहिल्यानंतर तुम्हालाही तिच्या भूमिकेचे आणि सिरिजमधल्या लूकचे कौतुक वाटेल. (सर्व फोटो सौजन्य- खुशबू अत्रे इन्स्टाग्राम)
टॅग्स :पंकज त्रिपाठीवेबसीरिजव्हायरल फोटोज्