1 / 8दाक्षिणात्य सुपरस्टार सी. जोसेफ विजय याने रविवारी तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेत आपल्या आयुष्यातील एका नव्या आणि ऐतिहासिक पर्वाला सुरुवात केली. चेन्नईच्या जवाहरलाल नेहरू इंडोर स्टेडियममध्ये पार पडलेल्या या सोहळ्याला चाहत्यांची अलोट गर्दी उसळली होती.2 / 8मात्र, या संपूर्ण सोहळ्यात सर्वांच्या नजरा खिळल्या होत्या त्या म्हणजे दाक्षिणात्य सुंदरी तृषा कृष्णन हिच्यावर! निळ्या रंगाच्या साडीत अप्सरेसारखी दिसणारी तृषा या सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरली.3 / 8या सोहळ्यातील एक व्हिडिओ आणि काही फोटो सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखे व्हायरल होत आहेत. तृषा आपली आई उमा कृष्णन यांच्यासोबत पहिल्या रांगेत बसण्यासाठी आली असताना, तिने विजयची आई शोभा चंद्रशेखर यांची भेट घेतली.4 / 8यावेळी तृषाने अत्यंत आदराने विजयच्या आईचे आशीर्वाद घेतले. शोभा चंद्रशेखर यांनीही मोठ्या प्रेमाने तृषाला मिठी मारली आणि दोघींमध्ये बराच वेळ संवाद रंगला.5 / 8हा शपथविधी सोहळा 'मदर्स डे'च्या दिवशीच पार पडला. आपल्या मुलाला राज्याच्या सर्वोच्च पदावर बसताना पाहून शोभा चंद्रशेखर यांचा आनंद गगनात मावेनासा होता. मात्र, तृषाने ज्या पद्धतीने त्यांच्या पाया पडून आदर व्यक्त केला, त्यावरून नेटकऱ्यांनी हे नातं आता मैत्रीच्या पलीकडे गेलं आहे का? अशा चर्चा सुरू केल्या आहेत.6 / 8विजय आणि तृषा ही सर्वात लोकप्रिय जोडी मानली जाते.'घिल्ली'पासून ते 'लिओ'पर्यंत या जोडीने अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत. मात्र, गेल्या काही काळापासून विजय आणि त्याची पत्नी संगीता यांच्यात दुरावा निर्माण झाल्याच्या आणि त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चा रंगत आहेत. याच काळात विजय आणि तृषा यांच्यातील जवळीक वाढल्याच्या चर्चांनीही जोर धरला होता.7 / 8काही दिवसांपूर्वी चेन्नईतील एका लग्नसोहळ्यात हे दोघेही एकाच रंगाच्या कपड्यांमध्ये दिसले होते. त्यानंतर आता थेट मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीला तृषाने सहकुटुंब लावलेली उपस्थिती आणि विजयच्या आईसोबतची तिची केमिस्ट्री पाहून चाहत्यांनी या अफवांना आता अधिकृत मानण्यास सुरुवात केली आहे.8 / 8विजयने मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याचा आनंद एकीकडे असताना, दुसरीकडे तृषाच्या या साध्या वागणुकीमुळे चाहत्यांची मने जिंकली आहेत.