Satya Manjrekar :‘वेडात मराठे वीर दौडले सात’मध्ये झळकलेल्या सत्या मांजरेकरबद्दल जाणून घ्या काही खास गोष्टी...!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2022 16:40 IST
1 / 8दिश्दर्शक महेश मांजरेकर यांनी नुकतेच ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटाची घोषणा केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सात पराक्रमी मावळ्यांच्या शौर्याची गाथा ते या चित्रपटातून सांगणार आहेत.2 / 8या चित्रपटात अभिनेता अक्षय कुमार छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारताना दिसणार आहे. महेश मांजरेकर यांचा मुलगा सत्या मांजरेकर हा सुद्धा या चित्रपटात एका महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहे.3 / 8 ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ चित्रपटात मांजरेकरांचा मुलगा सत्या हा दत्ताजी पागे ही भूमिका साकारतोय. सध्या त्याचीच चर्चा आहे. आज याच सत्याबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.4 / 8सत्या हा महेश मांजरेकर यांचा मुलगा आहे. रामनारायण रुईया कॉलेजमधून त्याचं महाविद्यालयीन शिक्षण झालं आणि सत्या अभिनयाच्या दुनियेत आला.5 / 8 1995 साली रिलीज झालेला ‘आई’ हा सत्याचा पहिला सिनेमा. याच सिनेमातून त्याने आपल्या अॅक्टिंग करिअरची सुरूवात केली.6 / 82005 साली त्याचा बॉलिवूड डेब्यू झाला. ‘वाह, लाईफ हो तो ऐसी’ या बॉलिवूडपटात तो झळकला.7 / 8 पोर बाजार आणि जाणिवा या चित्रपटात काम केलं. महेश यांनी दिग्दर्शित केलेल्या एफयू : फ्रेंडशिप अनलिमिटेड या चित्रपटातही तो दिसला होता. 8 / 8‘1962- द वॉर इन हिल्स’ या वेबसीरिजमधून त्याने डिजिटल जगतात पाऊल टाकलं. या सीरिजमध्ये अभय देओल, सुमीत व्यास, आकाश ठोसर, अनुप सोनी, माही गिल असे अनेक कलाकार झळकले होते.