Join us  

Urvashi Rautela: रिषभ पंत नव्हे तर 'टीम इंडिया'चा विवाहित क्रिकेटपटू म्हणाला- उर्वशी रौतेला सर्वात सेक्सी अभिनेत्री!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2023 1:59 PM

1 / 9
Urvashi Rautela Sexiest Actress, Indian Cricket : बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला तिच्या हॉटनेस आणि ग्लॅमरस स्टाइलसाठी ओळखली जाते. उर्वशीचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.
2 / 9
उर्वशी रौतेला तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही नेहमीच चर्चेत असते. तिचे नाव अनेकदा क्रिकेटपटू रिषभ पंतसोबत जोडले जाते. अनेक वेळा ती स्टेडियममध्ये सामना पाहायला आल्याचेही दिसले आहे.
3 / 9
उर्वशी साधारणपणे क्रिकेटच्या मुद्द्यावर ट्रोलिंगची शिकार ठरते. पण, या सगळ्यात एका भारतीय क्रिकेटपटूने मात्र उर्वशीला सर्वात सेक्सी अभिनेत्री म्हटले आहे.
4 / 9
उर्वशी रौतेला लवकरच हॉलिवूड प्रोजेक्ट्समध्ये दिसणार आहे. ती लवकरच मिशेल मोरोनसोबत एका चित्रपटात दिसणार आहे.
5 / 9
दुसरीकडे उर्वशी लवकरच रणदीप हुडासोबत इन्स्पेक्टर अविनाश या चित्रपटात दिसणार आहे. बरेच दिवस ती बॉलिवूडमध्ये दिसली नसली तरी आता ती पुन्हा एकदा हिंदी चित्रपटात झळकणार आहे.
6 / 9
याशिवाय उर्वशी ब्लॅक रोज या थ्रिलर चित्रपटातही दिसणार आहे. थिरुत्तू पायले २च्या हिंदी रिमेकमध्येही उर्वशीला संधी मिळाली आहे. त्यामुळे ती सध्या चांगल्या कारणांसाठी चर्चेत आहे. तशातच आता तिला एका स्टार क्रिकेटरने सर्वात सेक्सी अभिनेत्री म्हटल्याने तिच्यावर पुन्हा चर्चा रंगल्या आहेत.
7 / 9
आपल्या हॉट अँड फिट शैलीसाठी ओळखल्या जाणाऱ्या उर्वशीचे जगभरात अनेक चाहते आहेत. तिचं नाव क्रिकेट विश्वातील चाहत्यांना नुकतेच परिचयाचे झाले. रिषभ पंतशी तिचे नाव जोडले गेल्याने हा प्रकार वाढला होता.
8 / 9
उर्वशी बद्दल स्तुती करणारे शब्द रिषभ पंतने काढलेले नाही. एका अतिशय लोकप्रिय अशा भारतीय क्रिकेटरने उर्वशी रौतेलाबद्दल केलेल्या कमेंटमुळे तिची लोकप्रियता वाढली आहे.
9 / 9
उर्वशी बद्दल स्तुती करणारे शब्द रिषभ पंतने काढलेले नाही. एका अतिशय लोकप्रिय अशा भारतीय क्रिकेटरने उर्वशी रौतेलाबद्दल केलेल्या कमेंटमुळे तिची लोकप्रियता वाढली आहे.
टॅग्स :उर्वशी रौतेलारवींद्र जडेजाभारतीय क्रिकेट संघबॉलिवूड