Join us  

वयाच्या ४५ वर्षी आई झाल्याचा अभिनेत्रीला होतोय पश्चात्ताप, म्हणाली, "तयार असाल तेव्हाच..."

By ऑनलाइन लोकमत | Published: November 07, 2023 11:26 AM

1 / 8
टीव्हीवरील लोकप्रिय अभिनेत्री संगीता घोषने (Sangita Ghosh) डिसेंबर 2021 मध्ये लेकीला जन्म दिला. तिचं नाव देवी असं आहे. प्रिमॅच्योर डिलीव्हरी झाल्याने बाळाला १५ दिवस NICU मध्ये ठेवण्यात आले होते.
2 / 8
अखेर १५ दिवसांनंतर संगीताला बाळाला घरी आणता आलं. मात्र घरी आणल्यानंतर तिला १० दिवसही बाळाच्या जवळ राहता आलं नाही. कारण तिला पुन्हा कामावर परतावं लागलं.
3 / 8
४७ वर्षीय संगीताने नुकतंच आई होणं आणि बाळाचं पालनपोषण करणं यावर भाष्य केलं आहे. लेकीला पुरेसा वेळ देता येत नाही म्हणून तिला आता पश्चात्ताप होत आहे.
4 / 8
अभिनेत्री संगीता घोषने ४५ वर्षांची असताना लेकीला जन्म दिला होता. २५ डिसेंबर २०२१ रोजी देवीचा जन्म झाला. मात्र लेकीच्या जन्मानंतर संगीताला २५ दिवसातच कामावर परतावं लागलं.
5 / 8
अभिनेत्री म्हणाली,'मला वाटतं तुम्ही तेव्हाच पालक बनलं पाहिजे जेव्हा तुम्ही बाळाचा सांभाळ करण्यासाठी पूर्णपणे तयार असाल. आजच्या काळात तंत्रज्ञान प्रगत झालं आहे आणि अनेक उपाय आहेत. तुम्ही मूल दत्तकही घेऊ शकता.
6 / 8
त्यामुळेच तुम्ही कोणत्याही वयात आई होण्याचा निर्णय घेऊ शकता. बाळाचा सांभाळ करण्यासाठी तुम्ही सक्षम असलं पाहिजे. मुलाला वाढवणं हे कठीण असलं तरी खूप फुलफिलींगही आहे.
7 / 8
तसंच बाळाच्या जन्मानंतर अनेक महिला स्वत:ची काळजी घेत नाहीत.पण मी स्वत:च्या तब्येतीकडे लक्ष देते. मला आठवतं मी माझ्या २५ दिवसांच्या मुलीला सोडून कामावर गेले होते. ते माझ्यासाठी खूप कठीण होतं.
8 / 8
सुरुवातीला मला तिला पूर्ण वेळ देता यायचा नाही. पण माझ्या पतीने मला पाठिंबा दिला. त्यांनी देवीला सांभाळलं. मी कामावर गेल्यानंतर रोज तिच्याशी व्हिडिओ कॉलवर बोलायचे. मला तिला शिकवायचं आहे की महिलांनी कधीच आपली स्वप्न मारली नाही पाहिजे.
टॅग्स :संगीता घोषटिव्ही कलाकारलहान मुलंपालकत्व