प्रत्येक नृत्याला तनयने भरभरून स्तुती व गुण मिळविलेले आहेत. तरीही तो अद्याप टॉप ६ मध्ये आपली जागा निश्चित करू शकलेला नाही. आतापर्यंत टॉप ५ निवडलेले आहेत. त्यात काश्मीरचा पियूश भगत, नेपाळचा सुशांत खत्री, सिक्किमचा मिग्मा, चंदीगढचा बेंडिट्स ग्रुप व दिल्लीचा अर्बन क्रू निवडले गेले आहे. स्पर्धेत महाराष्ट्राचे अजून खाते उघडलेले नाही.
२० रोजी शेवटचा भाग असून त्यात टॉप १२ पैकी उरलेले ७ स्पर्धक व स्टॅँडबाय मधील ३ अशा एकूण १० पैकी फक्त एकाचा पहिल्या ६ मध्ये समावेश होणार आहे. पहिल्या ६ मध्ये येण्यासाठी दिवस-रात्र मेहनत करणारा जळगावचा तनय आपले सर्वस्व पणाला लावून महाराष्ट्राची शान राखण्याचा प्रयत्न करणार आहे. त्याचे कोरिओग्राफर धर्मेशही त्यासाठी प्रयत्नशील आहेत.
....तर तो जाणार ‘टॉप फोर’ मध्ये
२० व २१ रोजी रात्री ८ वाजता स्टार टीव्हीवरील ‘डान्स प्लस सिझन २’ हा कार्यक्रम होणार आहे. पहिल्या ६ मध्ये निवड झाल्यावर यापुढे जशा फेऱ्या संपतील; तसे गुण देणेही बंद होईल. सहाच्या सहा नृत्य करणारे स्पर्धक दर आठवड्याला आपले नृत्य सादर करतील व जनतेला मतदान करण्याचे आवाहन करतील. ज्या स्पर्धकाला सर्वात जास्त मते मिळतील तो स्पर्धक पहिल्या ४ साठी पात्र ठरेल. या पद्धतीने पुढील चार आठवडे कार्यक्रम चालेल. त्यात पहिले ४ स्पर्धक जनतेमार्फत निवडण्यात येतील व नंतर फिनाले होईल. यात पहिले ४ सादरीकरण करतील व त्यातून मतदानाच्या आधारे पहिला, दूसरा व तिसरा विजेता निवडला जाईल.