परेश रावल यांची पत्नीदेखील आहे दिसायला सुंदर; पाहा त्यांचे फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2021 18:30 IST
1 / 9कधी विनोदी तर कधी खलनायकाची भूमिका साकारून प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन केलं ते दिग्गज कलाकार म्हणजे परेश रावल (Paresh Rawal). उत्तम अभिनय शैलीच्या जोरावर परेश रावल यांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे.2 / 9'हेरा फेरी', 'संजू', 'ऐतराज','दिल का रिश्ता', 'नायक' अशा कितीतरी चित्रपटांमध्ये अभिनय करत त्यांनी प्रेक्षकांची मन जिंकली. 3 / 9परेश रावल यांच्या कलाविश्वातील कारकिर्दीविषयी प्रत्येकालाच माहित आहे. परंतु, त्यांच्या पत्नीविषयी फार मोजक्या लोकांना माहित आहे. 4 / 9परेश रावल यांच्या पत्नीचं नाव परेश स्वरूप संपत (Swaroop Sampat) असून त्यांचं लव्ह मॅरेज आहे.5 / 9परेश रावल आणि स्वरुप यांची लव्हस्टोरी खूप भन्नाट आहे. एका मुलाखतीत त्यांनी त्याच्या पहिल्या भेटीचा किस्सा सांगितला होता.6 / 9कलाविश्वात येण्यापूर्वी परेश रावल एका कंपनीत काम करत होते. या कंपनी मालकाची लेक म्हणजे स्वरुप. विशेष म्हणजे या मालकाच्या मुलीच्याच प्रेमात ते पडले आणि त्यांनी लग्नदेखील केलं. 7 / 9परेश आणि स्वरुप यांचं लग्न १९८७ साली झालं असून त्यांना आदित्य आणि अनिरुद्ध ही दोन मुलं आहेत.8 / 9स्वरुप या १९७९ मध्ये मिस इंडियादेखील जिंकल्या आहेत.9 / 9स्वरुप यांनी काही चित्रपट, मालिकांमध्येही काम केलं आहे. हिम्मतवाला, साथियाँ या चित्रपटामध्ये त्या झळकल्या आहेत.