Join us

'बिग बॉस'नंतर आत्महत्येचा विचार, दारूचं व्यसन लागलं; आता वयाची ३५शी उलटल्यानंतर 'या' अभिनेत्रीनं थाटला संसार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2023 15:35 IST

1 / 7
बॉलिवूडमधील प्रसिद्ध नाव पायल रोहतगी आज तिचा ३९ वा वाढदिवस साजरा करत आहे. पायल रोहतगी आज आनंदी जीवन जगत आहे पण एक काळ असा होता जेव्हा तिला जगायचे नव्हते. ही गोष्ट त्यावेळची आहे जेव्हा ती बिग बॉस २ च्या घरातून बाहेर आली होती.
2 / 7
कंगना राणौतच्या रिअॅलिटी शो 'लॉकअप'मध्ये तिच्या आयुष्यातील हा भाग उघड करताना पायल रोहतगी म्हणाली, 'मी गेल्या वेळी बिग बॉस सीझन २ हा रिअॅलिटी शो केला होता, तेव्हा मला तिथे पूर्णपणे नकारात्मक दाखवण्यात आले होते.
3 / 7
तिथे दाखवलेला लव्ह अँगल माझ्या वैयक्तिक आयुष्यासाठी पूर्णपणे हानिकारक ठरला. जेव्हा मी या शोमधून बाहेर पडलो तेव्हा मला खूप प्रसिद्धी आणि लोकप्रियता मिळाली पण नकारात्मक पद्धतीने, असे पायलने सांगितले.
4 / 7
पायल रोहतगीने तिच्या आयुष्यातील कठीण टप्प्याबद्दल सांगितले की, 'बिग बॉस २च्या घरातून बाहेर आल्यानंतर मी पूर्णपणे तणावात होते. मला दारू पिण्याचे व्यसन लागले होते. मी सतत दारू प्यायचे. त्यावेळी दिवस आहे की रात्र हेच कळत नव्हते. मी आत्महत्येचा विचारही केला होता.
5 / 7
पायल रोहतगीने सांगितले की, जेव्हा ती तिच्या वाईट टप्प्यातून जात होती, तेव्हा तिच्यासोबत एकच व्यक्ती उभा होता, तो म्हणजे संग्राम. संग्राम सिंह हे प्रसिद्ध भारतीय कुस्तीपटू आणि अभिनेता आहेत.
6 / 7
या कठीण प्रसंगातून बाहेर येण्यासाठी संग्राम हा एकमेव व्यक्ती होता. त्याची सततची थेरपी आणि चांगल्या संगतीमुळे ती या टप्प्यातून बाहेर पडू शकली. इथून त्यांची संग्रामशी जवळीक वाढली आणि दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले.
7 / 7
दोघांनी काही वर्षे एकमेकांना डेट केले आणि नंतर लग्न केले. आज पायल आणि संग्राम सुखी जीवनाचा आनंद घेत आहेत.
टॅग्स :पायल रोहतगीबिग बॉस