Join us
Daily Top 2Weekly Top 5

ठिपक्यांची रांगोळी...! येतेय आणखी एक नवी मालिका, त्यातला ‘हा’ सुंदर चेहरा कुणाचा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2021 10:06 IST

1 / 8
लवकरच स्टार प्रवाह या वाहिनीवर एक नवीकोरी मालिका दाखल होतेय. नाव आहे, ठिपक्यांची रांगोळी. नुकताच मालिकेचा प्रोमो रिलीज झाला आणि तो पाहून प्रेक्षकांच्या हृदयाचा ठोका चुकला.
2 / 8
होय, प्रोमोतील एका सुंदर चेह-यावर प्रेक्षकांची नजर रोखली गेली. हा सुंदर चेहरा कुणाचा तर अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर हिचा. ठिपक्यांची रांगोळी या मालिकेत ती मुख्य भुमिकेत दिसणार आहे.
3 / 8
ज्ञानदा रामतीर्थकर ही मराठीचा लोकप्रिय चेहरा आहे. हिंदी मालिकांमध्येही तिनं काम केलं आहे. ज्ञानदा ही मूळची सांगली जिल्ह्यातील विटा शहरातली आहे .
4 / 8
पुण्यात कॉलेजमध्ये शिकत असताना ज्ञानदाचे रंगभूमीवर पदार्पण झाले. अभिनयाची आवड जोपासत असताना कलर्स मराठी वाहिनीवरील ‘सख्या रे’ या मालिकेतून तिला पहिल्यांदा छोट्या पडद्यावर झळकण्याची संधी मिळाली. या मालिकेत तिने वैदेहीची भूमिका साकारली होती.
5 / 8
जिंदगी नॉट आउट, शतदा प्रेम करावे, शादी मुबारक या मराठी आणि हिंदी मालिकेत ती झळकली. तू इथे जवळी रहा, प्रेमाची आरती या गाण्यातूनही ती प्रेक्षकांसमोर आली होती.
6 / 8
‘धुरळा’ या गाजलेल्या चित्रपटातही ज्ञानदा महत्वाची भूमिका साकारताना दिसली. ‘दोस्ती दिल धोका’ हा तेलगू चित्रपटही तिने साकारला आहे. ' ठिपक्यांची रांगोळी या मालिकेतून ज्ञानदा रामतीर्थकर पुन्हा एकदा मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे.
7 / 8
लीना भागवत, मंगेश कदम, शरद पोंक्षे, सुप्रिया पाठारे, नम्रता प्रधान, अमृता फडके, सारिका नवाथे अशी भली मोठी स्टार कास्ट या मालिकेला लाभली आहे.
8 / 8
चेतन वडनेरे हा यात मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहे. अभिनेता चेतन वडनेरे अल्टी पल्टी , फुलपाखरू, लेक माझी लाडकी, काय घडलं त्या रात्री या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. ज्ञानदा आणि चेतनची ही नवी कोरी मालिका येत्या 4 ऑक्टोबरपासून प्रेक्षकांच्या भेटीस येतेय.
टॅग्स :स्टार प्रवाह