Join us  

IN PICS : शूटींग सेटवरच प्रेमात पडले हे टीव्ही स्टार्स, जाणून घ्या आता कसं आहे नातं?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2022 8:00 AM

1 / 10
टीव्हीच्या दुनियेतील लव्ह अफेअर्सही कमी चर्चेत नसतात. अनेक जण एकत्र काम करता करता प्रेमात पडले आणि लग्नबंधनात अडकले. पुढे या नात्यांचं काय झालं?
2 / 10
राम कपूर व गौतमीची लव्हस्टोरी तुम्हाला ठाऊक असेलच. ‘एक मंदिर’ या मालिकेच्या सेटवर हे कपल प्रेमात पडलं आणि वर्षभर एकमेकांना डेट केल्यानंतर लग्नबंधनात अडकलं. हे कपल आज सुखात नांदतंय.
3 / 10
गुरमीत चौधरी व देबिना बॅनर्जी हे दोघे ‘रामायण’ मालिकेच्या सेटवरच प्रेमात पडले होते. 2011 मध्ये दोघांनी लग्न केलं. आजही हे कपल प्रेमात नांदतंय.
4 / 10
सध्या बिग बॉस 16 मध्ये टीना दत्ताच्या प्रेमात पडलेला अभिनेता शालीन भनोट हा एकेकाळी अभिनेत्री दलजीत कौरच्या प्रेमात वेडा झाला होता. दोघांनीही लग्न केलं. पण हे लग्न फार काळ टिकलं नाही.
5 / 10
जेनिफर विंगेट आणि करण सिंग ग्रोव्हर हे दोघे ‘दिल मिल गए’च्या सेटवर भेटले आणि पुढे प्रेमात पडले. 2012 मध्ये दोघांनी लग्न केलं आणि दोनच वर्षात दोघांचा घटस्फोट झाला. करणने नंतर बिपाशा बासूसोबत दुसरं लग्न केलं.
6 / 10
संजीदा शेख व आमिर अली खान यांनी अनेक मालिकांमध्ये एकत्र काम केलं. शूटींग सेटवर सुरू झालेली ही लव्हस्टोरी 2012 मध्ये लग्नात बदलली. अर्थात दोघं एकमेकांपासून वेगळे झालेत.
7 / 10
‘मर्यादा’ या मालिकेत राकेश वशिष्ठ आणि रिद्धि डोग्रा यांनी एकत्र काम केलं होतं. दोघं प्रेमात पडले आणि लग्न केलं. पण हे नातं फार काळ चालू शकलं नाही.
8 / 10
रश्मी देसाई व नंदिश संधू हे दोघे ‘उतरन’ या मालिकेच्या सेटवर भेटले होते. दोघं एकत्र काम करताना प्रेमात पडले. लग्न झालं. पण लग्न फार काळ टिकू शकलं नाही.
9 / 10
गौरी प्रधान ही हितेन तेजवानीची दुसरी पत्नी आहे. सांस भी कभी बहू थी या मालिकेच्या सेटवर दोघं प्रेमात पडले आणि 2004 मध्ये दोघांनी लग्न केलं. दोघं सुखात संसार करत आहेत.
10 / 10
रवी दुबे आणि सरगुन मेहता हे टीव्ही इंडस्ट्रीचं मेड फॉर इच अदर कपल आहे. सेटवर त्यांची लव्हस्टोरी सुरू झाली आणि ही लव्हस्टोरी आजही तेवढीच टवटवीत आहे.
टॅग्स :टिव्ही कलाकारराम कपूररश्मी देसाईहितेन तेजवानीटेलिव्हिजन