Join us  

दुसऱ्या लग्नाची गोष्ट..! पहिल्या पत्नीपासून चार मुलं, घटस्फोट न घेताच अभिनेत्यानं थाटला दुसरा संसार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2023 6:33 PM

1 / 7
एकीकडे अभिनेता सनी देओल गदर चित्रपटामुळे चर्चेत आहे तर दुसरीकडे त्याचा मुलगा करणच्या लग्नामुळेही देओल कुटुंब चर्चेत आले आहे. करणच्या लग्नात सर्वांनी खूप धमालमस्ती केली. मात्र या सोहळ्याला हेमा मालिनी गैरहजर होत्या. त्यामुळे पुन्हा एकदा धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांची लव्हस्टोरी चर्चेत आली आहे.
2 / 7
हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांची लव्हस्टोरी काही वर्षांपूर्वी खूप चर्चेत आली होती. हेमा मालिनी यांच्याशी लग्न करण्यापूर्वी धर्मेंद्र विवाहित होते. त्यामुळे त्यांच्या लग्नाची खूप चर्चा झाली होती. तसेत हेमा मालिनींचे वडील या लग्नाबाबत नाराज होते. एका मुलाखतीत हेमा मालिनी यांनी याबाबत भाष्य केले होते.
3 / 7
हेमा मालिनी यांच्याशी लग्न केले त्यावेळी धर्मेंद्र यांना पहिल्या पत्नीपासून चार मुले होती. पहिली पत्नी प्रकाश कौर यांच्याबरोबर धर्मेंद्र यांचा घटस्फोटही झाला नव्हता.
4 / 7
यामुळे हेमा मालिनी यांच्या वडिलांना धर्मेंद्र यांच्यासोबत असलेले नाते अमान्य होते. रजत शर्मा यांच्या आप की अदालत या कार्यक्रमात हेमा मालिनी यांना त्यांच्या लव्हस्टोरीबाबत विचारण्यात आले होते.
5 / 7
त्यावेळी हेमा मालिनी म्हणाल्या की, धर्मेंद्र यांना मी पहिल्यांदा भेटली तेव्हा ते आयुष्यभर माझे जोडीदार असतील असा विचार मी कधीच केला नव्हता. कालांतराने मी त्यांच्या प्रेमात पडले.
6 / 7
या शोमध्ये वडिलांच्या नाराजीबाबतही हेमा मालिनी यांना विचारण्यात आले. यावर त्या म्हणाल्या, ही अगदी सामान्य गोष्ट आहे. कारण धर्मेंद्र यांचे आधीच लग्न झाले होते.
7 / 7
खरेतर धर्मेंद्र यांना चार मुलं असूनही हेमा मालिनी यांनी लग्न केले. धर्मेंद्र यांचं पहिल्या पत्नी प्रकाश कौर यांच्याबरोबर अजूनही चांगलं नातं आहे. करण देओलच्या लग्नामध्ये दोघांचे एकत्रित फोटोशूटदेखील चर्चेचा विषय ठरला.
टॅग्स :धमेंद्रहेमा मालिनीसनी देओल