झलक दिखला जा या डान्स रियालिटी शोच्या नवव्या सीझनसाठी सेलिब्रिटी
स्पर्धक आणि त्यांचे कोरियोग्राफर यांच्या नावावरुन पडदा उठलाय. मेरी
आशिकी तुमसे ही या मालिकेतील अभिनेता शक्ती अरोरा कोरियोग्राफर सुचित्रा
सावंतसह डान्सचा जलवा दाखवणार आहे.
नागिन फेम अर्जुन बिजलानी हा कोरियोग्राफर भावना खंडूजासह थिरकणार आहे.
कोरियोग्राफर कर्नल रॉर्ड्रिग्ससह सिझलिंग डान्स स्टेप्स करताना दिसेल बिग बॉसची एक्स स्पर्धक नोरा फातेही.
स्वरागिनी फेम हेली शाह हीसुद्धा झलक दिखला जाच्या
आगामी सीझनमध्ये आपल्या डान्सने रसिकांना घायाळ करणार आहे.. कोरियोग्राफर
जय कुमार नायरसह ती थिरकताना दिसेल.
अभिनेत्री सुरवीन चावला
कोरियोग्राफर सनम जोहरसह तर अभिनेता सिद्धांत गुप्ता कोरियोग्राफर
प्रणालीसह झलकचा मंच गाजवणार आहे.
बिग बॉस-8ची स्पर्धक करिष्मा तन्ना ही सुद्धा झलक दिखला जाच्या यंदाच्या सीझनमध्ये सहभागी होणार आहे. कोरियोग्राफर राजीव देवसह ती आपल्या डान्स स्टेप्स दाखवणार आहे
तर शांतनु महेश्वरी कोरियोग्राफर अलिशा सिंगसह थिरकेल. या सर्व स्पर्धकांना जज करतील करण जोहर, गणेश हेगडे आणि बॉलीवुडची अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस. जॅकलिन या शोच्या निमित्ताने पहिल्यांदाच छोट्या पडद्यावर एंट्री मारतेय.