Join us

एमसी स्टॅन हे नाव कसं देण्यात आलं, त्याचं नेमकं खरं नाव काय?, जाणून घ्या...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2023 17:16 IST

1 / 10
पुण्याचा एमसी स्टॅन बिग बॉस १६ चा विजेता ठरला. २३ वर्षाचा एमसी स्टॅन एक हिंदी रॅपर आहे. युट्युबवरचे त्याचे रॅप सॉन्ग प्रचंड लोकप्रिय आहेत.
2 / 10
एमसी स्टॅनची युनिक पर्सनॅलिटी बघून त्याला बिग बॉस हा शो ऑफर केला गेला आणि स्टॅनने या संधीचं सोनं केलं.
3 / 10
एमसी स्टॅनने ‘समझ मेरी बात को’ या गाण्याने आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. या गाण्यात त्याने DIVINE आणि EMIWAY सारख्या रॅपर्सचा उल्लेख करत त्यांना रोस्ट केलं होतं. त्याचं गाणं व्हायरल झालं आणि स्टॅन लोकप्रिय झाला.
4 / 10
एमसी स्टॅनचे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चाहते आहेत. मात्र एमसी स्टॅनच नक्की खरं नाव काय आहे आणि एमसी स्टॅन हे नाव त्याला कसं मिळालं?, हे तुम्हाला माहीतीय का?, नसेल तर नक्की जाणून घ्या.
5 / 10
‘बिग बॉस’च्या ट्रॉफीवर नाव कोरणारा एमसी स्टॅन पुण्याचा आहे. त्याचं खरं नाव अल्ताफ तडवी आहे.
6 / 10
एमसी स्टॅन याला अगदी लहान असल्यापासूनच रॅपिंगचे वेड लागले होते. हळूहळू तो स्वतःच रॅप सॉंग लिहायला लागला आणि त्यातून त्याला प्रसिद्धी देखील मिळू लागली.
7 / 10
एमसी स्टॅन हा अमेरिकन रॅपर ॲनिमिचा चाहता आहे, आणि आनीमेला त्याच्या चाहत्यांनी स्टॅन हे नाव दिलेला आहे. त्यावरूनच त्यांन स्वतःच नाव देखील स्टॅन असं ठेवलं.
8 / 10
एमसी म्हणजे मास्टर ऑफ सेरेमनी…तेव्हापासून तो एमसी स्टॅन या नावानेच प्रसिद्ध झाला.
9 / 10
एमसी स्टॅनचे वडील हे रेल्वेमध्ये हवालदार पदावर कार्यरत असून आई गृहिणी आहे. सध्या हे संपूर्ण कुटुंब मुंबईमध्ये स्थायिक झालेले आहे.
10 / 10
एमसी स्टॅन सुमारे १६ कोटींच्या संपत्तीचा मालक आहे. कॉन्सर्टमधून एमसी स्टॅनला मोठी रक्कम मिळते. एका प्रोग्रामसाठी तो ५ ते १० लाख रूपये चार्ज करतो.
टॅग्स :बिग बॉससोशल मीडिया