किश्वर आणि सुयश त्यांचे फोटो नेहमीच सोशल नेटवर्किंग साईटवर शेअर करत असतात. यामधीलच एका फोटोच्या खाली एकाने किश्वरला म्हातारी असे म्हटले आहे. तर एकाने म्हातारी आपल्या मुलाच्या वयाच्या मुलासोबत लग्न करत आहे असे कमेंट केले आहे. तर दुसऱ्याने ओल्ड आंटी, तुला लहान मुलासोबत लग्न करताना लाज वाटली पाहजे असे म्हटले आहे.
या सगळ्या कमेंटनंतर सुयशने किश्वर आणि त्याचा एक फोटो पोस्ट करत म्हटले आहे की, कोणी लग्न करत असताना 15-16 वर्षांच्या मुलानीही प्रतिक्रिया देणे सोशल मीडियामुळे किती सोपे झाले आहे. कोणीही कोणाच्या वैयक्तिक आयुष्यावर कसे काय बोलू शकते? मला या मुलांच्या आईवडिलांसाठी खूप वाईट वाटत आहे. यांची मुले कशाप्रकारे वागत आहेत हे पाहिल्यावर त्यांना नक्कीच वाईट वागेल. तुम्ही कोणाबाबत चांगले बोलू शकत नसाल तर त्याच्याबद्दल वाईट तरी बोलू नका. लग्नासारख्या मंगल प्रसंगी तर शत्रूदेखील आर्शीवाद देतात, तुम्ही तर अनोळखी आहात. असे काही लिहिले तर आपण कूल आहोत असे अनेकांना वाटते पण ते अत्यंत चुकीचे आहे.
आपल्या फॅन्सना आपल्या लग्नाबद्दल प्रत्येक गोष्ट कळावी असे किश्वर आणि सुयश यांना वाटत आहे आणि त्यासाठी ते त्यांच्या लग्नाची एक पाच भागांची वेबसीरिज बनवणार आहेत.