Join us

‘तू चाल पुढं’ मालिकेतील अश्विनीचा नवरा आहे प्रसिद्ध मराठी अभिनेता, पाहा कोण आहे तो?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2022 07:00 IST

1 / 12
छोटा पडद्यावर सध्या तू चाल पुढे या मालिकेनं कमी कालावधीत रसिकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेतून अभिनेत्री दीपा परब चौधरी(Deepa Parab-Chaudhary)ने मराठी सिनेइंडस्ट्रीत कमबॅक केले. दीपा हिचा नवरा देखील अभिनेता आहे.
2 / 12
तू चाल पुढे या मालिकेत अश्विनीच्या भूमिकेत दीपा आपल्याला पाहायला मिळते आहे.
3 / 12
दीपाने मराठा बटालियन या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. हा चित्रपट २००२ मध्ये आला होता.
4 / 12
त्याचप्रमाणे छोटी मा मालिकेतूनही तिने आपल्या अभिनयाची छाप उमटविली होती.
5 / 12
दीपा परब-चौधरी हिने चित्रपट, मालिकेशिवाय नाटकातही काम केले आहे.
6 / 12
स्टार प्लस वाहिनीवरील शौर्य और अनोखी कहानी या मालिकेत तिने काम केले आहे.
7 / 12
केदार शिंदे यांच्या ऑल दी बेस्ट या नाटकात ती दिसली होती. त्याचबरोबर सुबोध भावे प्रसाद यांच्या सोबतच्या क्षण या चित्रपटात ही दिसली होती. दीपाने थोडी खुशी थोडा गम, छोटी मा यासारख्या मालिका केल्या आहेत.
8 / 12
दीपाच्या नवऱ्याचं नाव अंकुश चौधरी असून तो मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता आहे.
9 / 12
दीपा आणि अकुंशने २००७ साली लग्न केले.
10 / 12
अंकुश चौधरी आणि दीपा परब यांना एक मुलगा आहे आणि त्याचे नाव प्रिन्स असे आहे.
11 / 12
दीपा परब हिने अंड्याचा फंडा या चित्रपटात काम केले आहे. लवकरच ती केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा' चित्रपटात झळकणार आहे.
12 / 12
‘बाईपण भारी देवा' चित्रपट ६ जानेवारी २०२३ ला प्रदर्शित होणार आहे.
टॅग्स :अंकुश चौधरी