Join us  

तितीक्षा तावडे करतीये 'या' बॉलिवूड अभिनेत्याला डेट; लवकरच बांधणार लग्नगाठ?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 06, 2023 5:17 PM

1 / 10
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे तितीक्षा तावडे. उत्तम अभिनयामुळे तितीक्षा कायमच चर्चेत येत असते.
2 / 10
सध्या तितीक्षा 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' या मालिकेत मुख्य भूमिका साकारत आहे.
3 / 10
अभिनयामुळे चर्चेत येणारी तितीक्षा सध्या तिच्या पर्सनल आयुष्यामुळे चर्चेत येत आहे.
4 / 10
तितीक्षा दृश्यम 2 फेम एका मराठमोळ्या अभिनेत्याला डेट करत असल्याचं म्हटलं जात आहे.
5 / 10
अभिनेता सिद्धार्थ बोडके आणि तितीक्षा एकमेकांना डेट करत असल्याचं म्हटलं जात आहे. इतकंच नाही तर ही जोडी लग्न करणार असल्याचंही सांगण्यात येत आहे.
6 / 10
गेल्या काही दिवसांपासून तितीक्षा आणि सिद्धार्थ यांचे एकत्र फोटो व्हायरल होत आहेत.
7 / 10
नुकताच तितीक्षाचा वाढदिवस झाला. यावेळी सिद्धार्थने दोघांचाही रोमँटिक आणि क्यूट फोटो शेअर केला होता.
8 / 10
सिद्धार्थने शेअर केलेल्या फोटोवरून दोघे रिलेशनमध्ये असल्याचा अंदाज लावला जातोय.
9 / 10
तितीक्षाने बर्थ डे सेलिब्रेशनचे फोटो पोस्ट केल्यानंतर त्यावर तिची बहीण अभिनेत्री खुशबू तावडे हिने nazar amulet emoji पोस्ट केली. त्यामुळे या चर्चेला उधाण आलं आहे.
10 / 10
तू अशी जवळी राहा या मालिकेत दोघांनी एकत्र काम केलं होतं.
टॅग्स :तितिक्षा तावडेसेलिब्रिटीटेलिव्हिजनसिनेमाबॉलिवूड