Join us  

तारक मेहता का उल्टा चष्मा: भिडे मास्तरांची रिअल लाइफ माधवीदेखील आहे अभिनेत्री; सौंदर्यात देते अनेकींना टक्कर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2022 10:51 AM

1 / 9
गेल्या १४ -१५ वर्षांपासून अविरतपणे प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी मालिका म्हणजे तारक मेहता का उल्टा चश्मा. या मालिकेतील प्रत्येक कलाकार लोकप्रिय झाला आहे. त्यातलंच एक नाव म्हणजे भिडे मास्तर.
2 / 9
गोकुळधाम सोसायटीचा एकमेव सेक्रेटरी आणि शिक्षक असलेल्या भिडे मास्तरांनी त्यांच्या अनोख्या अंदाजात प्रेक्षकांची मनं जिंकली.
3 / 9
या मालिकेत भिडे मास्तर ही भूमिका अभिनेता मंदार चांदवडकरने साकारली आहे. विशेष म्हणजे अभिनयासाठी विदेशातील नोकरी सोडून ते मुंबईत स्थायिक झाले.
4 / 9
इंजिनिअर असलेल्या मंदार यांनी दुबईतील नोकरी सोडून मुंबई गाठली आणि येथेच स्थायिक झाले. त्यांच्या या निर्णयात त्यांच्या पत्नीनेदेखील त्यांना साथ दिली.
5 / 9
तारक मेहतामध्ये अभिनेत्री सोनालिका जोशी हिने मंदारच्या म्हणजेच भिडे मास्तरांच्या पत्नीची माधवीची भूमिका साकारली आहे.
6 / 9
खऱ्या आयुष्यात मंदार यांच्या पत्नीचं नाव स्नेहल चांदवडकर असून त्यादेखील एक उत्तम अभिनेत्री आहेत.
7 / 9
स्नेहल चांदवडकर अभिनय क्षेत्राशी निगडीत असून त्यांनी अनेक चित्रपट, मालिकांमध्ये काम केलं आहे.
8 / 9
स्नेहल सोशल मीडियावर सक्रीय आहे. त्यामुळे त्या अनेकदा चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतात.
9 / 9
स्नेहल व मंदार यांना पार्थ हा लहान मुलगादेखील आहे.
टॅग्स :तारक मेहता का उल्‍टा चश्‍माटेलिव्हिजनटिव्ही कलाकार