Join us
Daily Top 2Weekly Top 5

चेहऱ्यावर सूज, वाढलेलं वजन, कुणी कामही देईना, गेल्या ३ वर्षांपासून अभिनेत्री करतेय गंभीर आजाराचा सामना

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2023 15:19 IST

1 / 9
'खतरों के खिलाडी ११'मध्ये सना मकबूल आणि विशाल आदित्य सिंग यांच्यात जबरदस्त केमिस्ट्री पाहायला मिळाली. त्यांच्या नात्याच्या चर्चाही सुरू झाल्या होत्या. पण सना अचानक इंडस्ट्रीतून गायब झाली. २०२१ पासून तिने कोणत्याही प्रोजेक्टमध्ये काम केलेले नाही.
2 / 9
सना मकबूलने २०१४ मध्ये तेलुगू चित्रपट 'दिक्कुलु चुडाकू रामय्या' द्वारे तेलुगू इंडस्ट्रीत प्रवेश केला. यानंतर तिने 'रंगून' या तमीळ चित्रपटात काम केले. सना २००९ पासून टीव्ही इंडस्ट्रीत सक्रिय आहे.
3 / 9
सना मकबूलने 'इशान: सपनो को आवाज दे', 'कितनी मोहब्बत है २', 'इस प्यार को क्या नाम दू?' अर्जुन, आदत से मजबूर आणि विशमध्ये काम केले. २०१३ ते २०१७ पर्यंत तमिळ-तेलुगू इंडस्ट्रीत काम केले.
4 / 9
विश नंतर सना मकबूल 'खतरों के खिलाडी ११' मध्ये स्पर्धक म्हणून दिसली होती. मात्र तेव्हापासून ती इंडस्ट्रीतून गायब आहे. नुकतेच तिने एका मुलाखतीत या मागचं कारण सांगितले.
5 / 9
सना मकबूलने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती म्हणाली, 'मला काहीतरी शेअर करायचे आहे जे खूप वैयक्तिक आहे. मी एक ऑटोइम्यून हिपॅटायटीस रुग्ण आहे आणि मला २०२० मध्ये त्याचे निदान झाले. या आजाराचा प्रवास मानसिक, शारीरिक, भावनिकदृष्ट्या कठीण आहे.'
6 / 9
सना मकबूल पुढे म्हणाली, 'सर्वात चांगली गोष्ट २०२१ मध्ये घडली, जेव्हा मी 'खतरों के खिलाडी'साठी गेले होते, तेव्हा मी औषधोपचार करत होते आणि मी ते चांगले केले. तिथून परत आल्यावर माझ्या मनात तीव्र भावना होती की मी आता सर्व काही करू शकते.'
7 / 9
सना मकबूल म्हणाली, 'पण जसे लोक म्हणतात, जेव्हा सर्व काही चांगले चालले असते तेव्हा काहीतरी वाईट घडते आणि माझ्यासाठीही असेच घडले जेव्हा माझे करिअर यशाच्या शिखरावर होते. त्यावेळी मला ब्रेक घ्यावा लागला. मी काम करत होते. पण मग मला तब्येतीवर लक्ष केंद्रित करावे लागले. मी आंतरिकरित्या अयोग्य होत चालले होते.'
8 / 9
सना मकबूल पुढे म्हणाली, 'गेली दीड वर्ष खूप कठीण गेली आहेत. मी मानसिक, शारीरिक आणि भावनिकदृष्ट्या थकले आहेत. खूप काम वाया गेले आहे. सुजलेला चेहरा, सुजलेले पाय, सुजलेले हात आणि वाढलेले वजन त्रासदायक आहे. एक अभिनेत्री म्हणून तुम्ही समजू शकता.'
9 / 9
सना मकबूलने व्हिडिओच्या शेवटी सांगितले की, तिची तब्येत सुधारत आहे. ती म्हणाली, 'मी या सर्व गोष्टींचा सामना केला आणि पुन्हा मजबूत झाले आणि आज, जागतिक हेपेटायटीस दिनानिमित्त, मी तुम्हाला सर्वांसोबत शेअर करू इच्छिते की मी F3-F4 रुग्ण होते आणि आता मी F1-F2 पर्यंत पोहोचले आहे. जी खूप चांगली सुधारणा आहे. आता, मी माझे काम पुन्हा सुरू करण्यास तयार आहे कारण मी तुमच्याप्रमाणे निरोगी आणि सामान्य आहे.'