Join us
Daily Top 2Weekly Top 5

सुंदरा मनामध्ये भरली मालिकेमध्ये रंगणार मंगळागौरची धुम

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2021 17:37 IST

1 / 11
श्रावणातल्या मंगळवारी मंगळागौरीची पूजा केली जाते. सुंदरा मनामध्ये भरली मालिकेमध्ये मोठ्या जल्लोषात हा सण साजरा केला जाणार आहे.
2 / 11
मंगळागौरीची चांगलीच जय्यत तयारी करण्यात आली आहे. आपल्या सगळ्यांच्या लाडक्या लतिकाने निळ्या रंगाची नऊवारी साडी नेसली आहे, साजेसे असे दागदागिने देखील परिधान केले आहेत.
3 / 11
सगळ्याच महिलांनी पारंपारिक नऊवारी साडी नेसली आहे. यात अपवाद म्हणजे कामिनी कारण तिला शिक्षा देण्यात आली आहे.
4 / 11
इतर महिलांसोबत लतिका देखील मंगळागौरीचे खेळ खेळताना दिसणार आहे.
5 / 11
कारणही तसंच आहे. आता हे काय कारण आहे ते लवकरच प्रेक्षकांना कळेल.
6 / 11
लतिकाची बँकेतील मैत्रीण रूपाली हिची ही मंगळागौर साजरी करण्यात येणार आहे.
7 / 11
त्यामुळेच मंगळागौरीची पारंपरिकरित्या पूजा करण्यात आली आहे.
8 / 11
सगळ्या बायका मिळून मोठया उत्साहात मंगळागौरीचे खेळ खेळताना दिसणार आहेत.
9 / 11
या पूजेसाठी रसिकाने धुमाळ आणि जहागीरदार कुटुंबाला आमंत्रण दिले आहे.
10 / 11
मंगळागौरीची पूजा पार पडते आणि त्यानंतर खेळांना सुरुवात होते.
11 / 11
पण, याच उत्साहाच्या वातावरणात आता कोणता नवा ट्विस्ट येणार ? काय घडणार ? हे पाहणे रंजक असणार आहे.