Join us

१७ व्या वर्षी अपघातात पाय गमावला, तरीही खचली नाही; लोकप्रिय अभिनेत्रीनं आज गाठलंय यशाचं शिखर

By देवेंद्र जाधव | Updated: May 13, 2025 17:00 IST

1 / 7
ही प्रेरणादायी गोष्ट एका अभिनेत्रीची. जिला नृत्य आणि अभिनयाची प्रचंड आवड होती. परंतु एका अपघाताने या अभिनेत्रीचं आयुष्य बदललं. या अभिनेत्रीचं नाव आहे सुधा चन्द्रन
2 / 7
१९८१ साल. सुधा तेव्हा १७ वर्षांची होती. तेव्हा बसमधून प्रवास करताना सुधा यांचा अपघात झाला आणि त्यांच्या पायाला जबर दुखापत झाली. डॉक्टरांनी उपचारानंतर डावा पाय बरा झाला पण उजव्या पायाला इन्फेक्शन झाल्याने गँग्रीन होण्याची शक्यता दिसू लागली
3 / 7
शेवटी दुर्दैवाने सुधा यांचा उजवा पाय गुडघ्यापर्यंत खाली साडे सात इंच कापावा लागला. यापुढे तुला कधीच चालता येणार नाही, असं डॉक्टरांनी सुधा यांना सांगितलं पण सुधाने हिंमत हरली नाही.
4 / 7
सुधा पुढे व्हीलचेअर आणि कुबड्यांचा आधार घेत चालू लागल्या. सुधा यांनी अपघात होऊनही त्यांचं भरतनाट्यमचं शिक्षण सुरुच ठेवलं. परंतु सुधा यांच्या पायातून रक्तस्त्राव व्हायचा.
5 / 7
त्यामुळे डॉक्टरांनी त्यांच्यासाठी कृत्रिम पाय तयार केला. या पायाच्या आधाराने सुधा यांनी नृत्याचं प्रशिक्षण सुरु ठेवलं. त्यानंतर सुधा यांनी मागे वळून पाहिलं नाही
6 / 7
१९८६ साली सुधा यांनी स्वतःच्या आयुष्यावरील 'नाचे मयुरी' या बायोपीकमध्ये काम केलं. या सिनेमासाठी सुधा यांना राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला.
7 / 7
अशाप्रकारे खऱ्या अर्थाने स्वतःच्या पायांवर उभं राहणाऱ्या अभिनेत्री सुधा चंद्रन यांची कहाणी सर्वांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे
टॅग्स :सुधा चंद्रनबॉलिवूडटेलिव्हिजन