पटत नसेल तर...! ब्राची पट्टी दिसली म्हणून म्हणून ट्रोल करणाऱ्यांना ‘रिटा रिपोर्टर’नं सुनावलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2021 15:46 IST
1 / 9‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ची रिटा रिपोर्टर अर्थात ही व्यक्तिरेखा साकारणारी अभिनेत्री प्रिया आहुजाने तिच्या काही फोटोंमुळे ट्रोल झाली होती.2 / 9प्रियाने अलीकडे तिचे काही ग्लॅमरस फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले होते आणि हे फोटो पाहून ट्रोलर्सने तिला ट्रोल करायला सुरूवात केली होती. या फोटोत प्रियाच्या ब्राची पट्टी दिसली आणि अनेकांनी यावरून प्रियाला ट्रोल केले होते.3 / 9फोटोत प्रियाच्या ब्राची पट्टी दिसली म्हणून लोकांनी प्रियाला नको ते ऐकवले. इतके की, लोकांच्या कमेंट वाचून तिचा पती मालव राजदाही संतापला होता.4 / 9आता खुद्द प्रियाने या ट्रोलर्सला सणसणीत उत्तर दिले आहे.फ्री प्रेस जर्नलला दिलेल्या मुलाखतीत प्रियाने ट्रोलर्सला चांगलेच फैलावर घेतले.5 / 9मी शेअर केलेल्या त्या फोटोत काहीही चुकीचे वा वादग्रस्त नव्हते. तरीही काही लोकांनी मला ट्रोल केले. नको त्या कमेंट्स केल्यात. पण या कमेंट्समुळे मला जराही फरक पडत नाही, असे ती म्हणाली.6 / 9कोणत्याही सेलिब्रिटीची पोस्ट पटत नसेल तर थेट त्याला अनफॉलो करण्याचा सोपा मार्ग आहे. पटतं असेल तर थांबा नाही तर अनफॉलो करा, इतकं सोप्प काम आहे, असेही ट्रोलर्सला तिने सुनावले.7 / 9 काही निराश लोक सोशल मीडियावर नको ते बोलतात. आपण काय बोलतोय, काय लिहितोय, हेही त्यांना कळत नसते. हे लोक स्वत: अस्वस्थ असतात आणि इतरांनाही अस्वस्थ करण्याच्या प्रयत्नात असतात, असे माझे ठाम मत आहे, असेही ती म्हणाली.8 / 9माझ्या पोस्टवर कोणी काहीही लिहिले तरी मला जराही फरक पडत नाही. ब-याचदा मी दुर्लक्ष करते. अति झाल्यास थेट त्या युजरला ब्लॉक करते, असे ती म्हणाली.9 / 9प्रियाने 2018 मध्ये दिग्दर्शक मालव राजदासह लग्न केले. त्या दोघांची ओळख ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ याच मालिकेच्या सेटवर झाली आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.