Photos: मेहंदी रंगली गं... शिवानीच्या हातावर रंगली अंबरच्या नावाची मेहंदी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2025 21:08 IST
1 / 10 नवीन वर्ष सुरु झालंय आणि अनेकांच्या घरी लग्नाची लगबग सुरु आहे. अभिनेत्री शिवानी सोनार (Shivani Sonar) आणि अभिनेता अंबर गणपुळे (Ambar Ganpule) लवकरच बोहल्यावर चढणार आहेत. 2 / 10शिवानी सोनारच्या घरी लग्नापूर्वींच्या विधींना सुरुवात झाली. शिवानीच्या मेहंदीचे फोटो समोर आले आहेत. 3 / 10शिवानीने मेहंदीसाठी लाल रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. तर तिचा होणारा नवरा अंबरने तिला मॅचिग कुर्ता घातला. 4 / 10अंबरसोबत तिनं मस्त कपल फोटोशूट केलं आहे. यात दोघेही खुपचं गोड दिसत आहेत. 5 / 10या सोहळ्यात शिवानी प्रचंड खूश दिसली.6 / 10गेल्या वर्षी गुढीपाढव्याच्या शुभमुहूर्तावर ९ एप्रिल २०२४ या दिवशी शिवानी सोनार आणि अंबर गणपुळेचा साखरपुडा झाला होता. त्यानंतर त्यांच्या लग्नाची सर्वत्र चर्चा होऊ लागली. 7 / 10अगदी काही महिन्यांपूर्वीच दोघांनीही मोठ्या दणक्यात त्यांची बॅचलर पार्टी साजरी केली. आता लवकर शिवानी-अंबर लग्नबेडीत अडकणार आहेत. 8 / 10 शिवानीला या नव्या प्रवासासाठी तिला तिच्या कलाकार मित्रांनीही शुभेच्छा दिल्याचं पाहायला मिळतंय.9 / 10शिवानी सोनारचा होणारा नवरा अंबर गणपुळे हा एक लोकप्रिय अभिनेता आहे. त्याने 'रंग माझा वेगळा', 'दुर्वा' या मालिकांमध्ये काम केलेलं आहे.10 / 10शिवानी सोनारबद्दल बोलायचं झालं, तर 'राजा राणीची गं जोडी' आणि 'तू भेटशी नव्याने' या मालिकांमुळे घराघरांत लोकप्रिय झाली.