IN PICS : मराठी मालिकेतील या खलनायिका एका एपिसोडसाठी किती मानधन घेतात माहितीये? वाचा...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2022 11:57 IST
1 / 8 ‘आई कुठे काय करते’ ही छोट्या पडद्यावरची लोकप्रिय मालिका. या मालिकेत संजनाची भूमिका साकारली आहे ती अभिनेत्री रूपाली भोसले हिने. मालिकेमध्ये सर्वाधिक लोकप्रिय पात्र म्हणून संजनाकडे पाहिले जाते. रुपालीची भूमिका नकारात्मक असली तरी प्रेक्षकांना ती आवडते. संजनाला एका भागासाठी तब्बल 42 हजार रुपये मानधन मिळते.2 / 8‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेत शालिनी हे ग्रे कॅरेक्टर अभिनेत्री माधवी निमकरने साकारले आहे. या भूमिकेत तिनं अगदी जीव ओतला. या भूमिकेसाठी ती किती मानधन घेते माहितीये? तर एका भागासाठी तब्बल 39 हजार रुपये.3 / 8‘रंग माझा वेगळा’ या मालिकेतील श्वेता तुमच्या ओळखीची असेलच. स्टार प्रवाहवरील या लोकप्रिय मालिकेत श्वेताची भूमिका अभिनेत्री अनघा भगरे साकारते आहे. तिने साकारलेली खलनायिकेची भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली आहे. या भूमिकेसाठी अनघा एका भागासाठी 25 हजार रुपये मानधन घेते.4 / 8‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेमध्ये सिमी ही भूमिका देखील लोकप्रिय ठरली आहे. अभिनेत्री शीतल क्षीरसागर हिने ही भूमिका साकारली आहे. एका भागासाठी ती 18 हजार रुपये मानधन घेते.5 / 8 ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेतील आयेशाच्या नकारात्मक भूमिकेवर प्रेक्षक फिदा आहेत. अभिनेत्री विदिशा म्हसकर ही भूमिका साकारते आहे. या मलिकेतील प्रत्येक एपिसोडसाठी ती 21 हजार रुपये मानधन घेत असल्याचं कळते.6 / 8 स्वप्निल जोशी, शिल्पा तुळसकरची मुख् भूमिका असलेल्या ‘तू तेव्हा तशी’ या मालिकेत अभिनेत्री अभिज्ञा भावे ही पुष्पवल्ली ही नकारात्मक छटा असलेली भूमिका साकारते आहे. तिची ही भूमिका प्रेक्षकांची मनं जिंकत आहे. अभिज्ञा एका भागासाठी 28 हजार रुपये मानधन घेत असल्याचे कळते.7 / 8 ‘मन उडू उडू झालं’ या मालिकेमध्ये सानिका हिने देखील नकारात्मक भूमिका चांगल्या प्रकारे साकारली आहे. सानिकाची भूमिका रिना अगरवाल हिने साकारली आहे. ती देखील लोकप्रिय अभिनेत्री आहे. ती एका भागासाठी 11 हजार रुपये मानधन आकारते.8 / 8आशा ही ‘सहकुटुंब सहपरिवार; या मालिकेमध्ये आशाची भूमिका देखील नकारात्मक असली तरी अतिशय लोकप्रिय अशी आहे. ही भूमिका अभिनेत्री किशोरी आंबियेने साकारली आहे. एका भागासाठी किशोरी आंबिये 19 हजार रुपये मानधन घेतात.