Join us

'मी आयुष्यात एकटीच...' पूजा भटला अश्रू अनावर; म्हणाली, 'माझं घर चालवणारंही...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2023 16:26 IST

1 / 7
बॉलिवूड अभिनेत्री पूजा भट (Pooja Bhatt) सध्या बिग बॉसमध्ये सहभागी झाली आहे. शोमध्ये पूजाने तिच्या अनेक वैयक्तिक बाबींचा खुलासा केला आहे. पूजा सुरुवातीपासूनच सर्वांची लाडकी बनली आहे. आपल्या पर्सनॅसिटीने तिने सर्वांचंच मन जिंकलंय.
2 / 7
अनेकदा पूजा आणि अभिषेक भांडताना दिसतात तर मध्येच ते गोड बोलतात. कोणी पूजा विरोधात उभं असो वा नसो अभिषेक एकटाच तिच्या विरोधात उभा राहतो.
3 / 7
नुकत्याच झालेल्या एपिसोडमध्ये घरातील सदस्यांना एक टास्क देण्यात आला होता. सर्वांना एकमेकांबद्दल सांगायचं होतं. यावेळी अभिषेक कुटुंबाची आठवण येते म्हणून तिच्यासमोर रडला. तेव्हाच पूजाच्या मनात वर्षानुवर्षे राहिलेलं दु:ख बाहेर आलं.
4 / 7
पूजा म्हणाली,'तुम्ही सर्वच आपापल्या कुटुंबाची आठवण काढत आहात. कोणी ना कोणी तुमची वाट पाहत आहेत. पण मी आयुष्यात एकटीच आहे. माझं घर चालवणारं कोणीच नाही.
5 / 7
यासोबतच पूजा म्हणाली मला वडिलांची खूप आठवण येतीए. असं याआधी कधी झालं नाही. बाकी लोक काय म्हणत आहेत याकडे मी लक्ष देत नाही. माझे वडील काय सांगत आहेत हे माझ्यासाठी महत्वाचं आहे.
6 / 7
पूजा आता निर्माती आणि दिग्दर्शन क्षेत्रात रमली आहे. तसंच ती 'बॉम्बे बेगम' सिनेमात दिसली होती. सध्या ती बिग बॉसमुळे चर्चेत आहे.
7 / 7
पूजा भटने मनिष मखिजासह 2003 साली लग्न केलं होतं. मात्र लग्नानंतर ११ वर्षांनी 2014 साली त्यांचा घटस्फोट झाला. यानंतर पूजाने परत लग्न केलं नाही. तेव्हापासून पूजा एकटीच आयुष्य घालवत आहे.
टॅग्स :पूजा भटबिग बॉसपरिवार