Join us

pics : ​आक्षका गोरडिया व ब्रेंट गोबल यांच्या ‘कॅथलिक मॅरेज’चे पाहायला विसरू नका!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2017 11:19 IST

टीव्ही अभिनेत्री आक्षका गोरडिया काल तिचा लाँग टाईम बॉयफ्रेन्ड ब्रेंट गोबलसोबत लग्नबंधनात अडकली. अहमदाबादेत आक्षका आणि ब्रेंट या दोघांचे ...

टीव्ही अभिनेत्री आक्षका गोरडिया काल तिचा लाँग टाईम बॉयफ्रेन्ड ब्रेंट गोबलसोबत लग्नबंधनात अडकली. अहमदाबादेत आक्षका आणि ब्रेंट या दोघांचे ख्रिश्चन पद्धतीने विवाह झाला. यावेळी आक्षका व ब्रेंट यांच्या कुटुृंबीयांसह दोघांचे अनेक मित्र-मैत्रिणी हजर होते.मौनी राय, सनम जौहर, अबिगेल पांडे, जुही परमार, सना खान, सुमित कौल, करणवीर बोहरा त्याची पत्नी टीजे, जय भानुशाली, माही विज आणि अदा खान अशा अनेकांनी आक्षकाच्या लग्नात हजेरी लावली. आक्षका आणि ब्रेंटची भेट गेल्या वर्षी जूनमध्ये अमेरिकेत एका कार्यक्रमाच्या दरम्यान झाली होती. ते दोघे पहिल्याच भेटीत एकमेकांच्या प्रेमात पडले. ब्रेंट हा एक व्यवसायिक आहे. तो मुळचा अमेरिकेचा असला तरी आक्षकासाठी तो गेल्या सप्टेंबरपासून भारतातच राहात आहे.ख्रिश्चन पद्धतीने झालेल्या विवाहसोहळ्यानंतर आक्षकाची मेहंदी आणि संगीत सेरेमनी झाली. यानंतर आज ३ डिसेंबरला आक्षका व ब्रेंट दोघेही हिंदू पद्धतीने विवाहबद्ध होणार आहेत. आक्षका आणि ब्रेंट यांना भारतीय परंपरेनुसार, रितीरिवाजानुसार लग्न करायचे आहे. त्यामुळे भारतातील एखाद्या शहरातच लग्न करायचे असे त्यांच्या डोक्यात कित्येक दिवसांपासून सुरू होते. अनेक शहरांचा विचार केल्यानंतर आता त्यांनी अहमदाबादमध्येच लग्न करण्याचे ठरवले. अहमदाबादमध्ये लग्न करण्यामागे एक खास कारण आहे. आक्षका ही गेल्या अनेक वर्षांपासून कामासाठी मुंबईत राहात असली तरी ती मुळची अहमदाबादची आहे. त्यामुळे त्या शहरासोबत तिचे एक विशेष नाते आहे. याविषयी आक्षका सांगते, ब्रेंटला नेहमीच भारतीय रितीरिवाजानुसारच लग्न करायचे होते. त्यामुळे आम्ही माझे आई-वडील जिथे राहातात, तिथेच लग्न करण्याचे ठरवले. अहमदाबाद या शहरासोबत माझ्या अनेक आठवणी जोडलेल्या आहेत. मी माझ्या आयुष्याची १६ वर्र्षे इथे राहिली आहे.   ब्रेंटच्या एका चुलत भावाचे लग्न देखील गुजरातमध्येच झाले होते. त्यामुळे त्याची देखील गुजरातमध्येच लग्न करण्याची इच्छा होती आणि त्यात त्याला गुजराती जेवण खूप आवडते.