Join us

अभिनयासाठी पत्रकारिता सोडली, आज लोकप्रिय मालिकेत करतेय काम, कोण आहे ती?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2025 17:31 IST

1 / 8
अभिनयाच्या चंदेरी दुनियेत नाव कमावण्याचं स्वप्न प्रत्येकाचं असतं. त्यासाठी अनेक कलाकार मुंबईत दाखल होतात. मात्र, त्यातील मोजकेच कलाकार असतात जे या चंदेरी दुनियेत यशस्वी ठरतात. कलाविश्वात यशस्वी होण्यासाठी प्रत्येकजण धडपड करत असतो.
2 / 8
कठोर परिश्रम आणि मेहनतीने मनापासून एखादं काम केलं की सर्वकाही शक्य होतं, असं म्हटलं जातं. जोपर्यंत एखादी व्यक्ती रिस्क घेत नाही, तोपर्यंत ती यशस्वी होऊ शकत नाही. अशीच एक अभिनेत्री जिने पत्रकारिता नोकरी सोडून अभिनयाची वाट धरली. तर कोण आहे ही अभिनेत्री जाणून घेऊया....
3 / 8
'राणी मी होणार', '36 गुणी जोडी' व 'सख्या रे' यांसारख्या मालिकांमधून अभिनेत्री सुरभी भावे घराघरात पोहोचली. दमदार अभिनयासह निखळ सौंदर्याने तिने चाहत्यांच्या मनावर मोहिनी घातली. तिने साकारलेली प्रत्येक भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती.
4 / 8
'राणी मी होणार', '36 गुणी जोडी' व 'सख्या रे' यांसारख्या मालिकांमधून अभिनेत्री सुरभी भावे घराघरात पोहोचली. दमदार अभिनयासह निखळ सौंदर्याने तिने चाहत्यांच्या मनावर मोहिनी घातली. तिने साकारलेली प्रत्येक भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती.
5 / 8
'राजश्री मराठी'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये सुरभी म्हणाली, 'मी बीएमएम करत होते आणि जर्नालिझमध्येच मी पुढील शिक्षण पूर्ण केलं. स्टार माझा जे आताचं एबीपी माझा आहे त्या चॅनेलमध्ये आधी मी इंटर्नशिप केली आणि मग जॉब केला. पण, मनोरंजन हेच माझं बिट होतं. त्यामुळे आताच्या फिल्डमध्ये जे सिनिअर कलाकार आहेत त्यांच्या मी मुलाखती घ्यायचे.'
6 / 8
त्यानंतर अभिनेत्री म्हणाली, 'तेव्हा असं कुठेतरी वाटायचं की त्या साईडला मी असलं पाहिजे. मला कोणीतरी विचारलं पाहिजे की, या व्यक्तिरेखा साकरताना तुला काम करताना कशी मजा आली तू यासाठी काय विशेष मेहनत घेतलीस पण तेव्हा ते शक्य नव्हतं. दिवसातून पाच-पाच इव्हेंट कव्हर करायचे. लोकांना फक्त असं वाटतं की छान, छान दिसायचं कीश आहेस वैगरे असं विचारायचं एवढंच काम असतं.'
7 / 8
'पण, खरंतर तसं नसतं. लोकांना फक्त ग्लॅमर दिसतं. प्रत्येकजण मेहनतच करत असतो. त्यावेळेला आताचे जे सिनिअर पत्रकार आहेत त्यांच्या इन्टर्नशिप चालू असायच्या. तर खूप मजा यायची आणि रात्री-अपरात्री काम करताना सुद्धा काही वेगळं वाटायचं नाही. असा खुलासा अभिनेत्रीने केला.
8 / 8
अभिनेत्री सुरभी भावेच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर सध्या ती स्टार प्रवाहच्या तू ही रे माझा मितवा काम करताना दिसते आहे. या मालिकेत वल्लरी नावाची खलनायिकी भूमिका ती साकारते आहे.
टॅग्स :टेलिव्हिजनसेलिब्रिटी