Join us  

Ruchira Jadhav : खल्लास!! मराठमोळी अभिनेत्री रूचिरा जाधवचा बोल्ड बिकिनी लुक, पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2022 2:45 PM

1 / 9
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे रुचिरा जाधव. सध्या तिच्या बिकिनी फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.
2 / 9
स्विमींग पूलमध्ये रेड बिकिनी घालून रूचिराने केलेलं बोल्ड फोटोशूट सध्या चर्चेत आहेत. यात रूचिराने एकापेक्षा एक पोझ दिल्या आहेत.
3 / 9
रूचिराचे हे बोल्ड बिकिनी फोटो पाहून चाहते क्रेझी झाले आहेत. या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
4 / 9
‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेत माया ही भूमिका साकारून रुचिरा विशेष प्रसिद्धीस आली. ही मालिका संपून आता बराच काळ लोटला आहे. मात्र, तिची लोकप्रियता यत्किंचितही कमी झालेली नाही.
5 / 9
रुचिरा सोशल मीडियावर कमालीची सक्रीय असून अनेकदा तिचे ग्लॅमरस फोटो, व्हिडीओ शेअर करत असते.
6 / 9
‘माझ्या नवऱ्याची बायको’ शिवाय बेदुणे दहा, माझे पती सौभाग्यवती, प्रेम हे, तुझ्यावाचून करमेना अशा अनेक मालिकांमध्ये रूचिराने दमदार भूमिका साकारल्या आहेत.
7 / 9
शुद्ध देसी या युट्यूब चॅनलवरील ‘माझ्या मित्राची गर्लफ्रेंड’ या वेब सीरिजमध्येही तिने काम केलं आहे. तसंच ‘बंच ऑफ रेड रोजेस’ हे नाटक आणि ‘लव्ह लफडे’ या चित्रपटातही ती झळकली आहे.
8 / 9
रुचिराचे फोटो नेहमीच साऱ्यांचचं लक्ष वेधून घेतात. सोशल मीडियावर तिची मोठी फॅनफॉलोइंग आहे.
9 / 9
रुचिराचं शालेय शिक्षण पराग विद्यालयामध्ये झालं, त्यानंतर तिने के.जे सोमय्या कॉलेजमधून आपलं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. कॉलेजमध्ये असल्यापासूनच रुचिरा अभिनयामध्ये नाव गाजवत होती.
टॅग्स :टेलिव्हिजनटिव्ही कलाकारमाझ्या नवऱ्याची बायको