१६ डिसेंबर हा लक्ष्मीकांत बेर्डे यांचा स्मृती दिन... या दिवशी या लाडक्या अभिनेत्याने या जगातून एक्झिट घेतली होती. परंतु त्यांनी मागे असंख्य आठवणी ठेवल्या आहेत. त्यांच्या याच आठवणींना चला हवा येऊ द्यामधून उजाळा देण्यात येणार आहे. चला हवा येऊ द्याच्या या खास भागात महेश कोठारे, विजय कदम, निवेदिता सराफ, किशोरी शहाणे, किशोरी अंबिये आणि इतर काही कलाकार सहभागी होणार आहेत.
विशेष म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे यांचा मुलगा अभिनयसुद्धा या भागात सहभागी झाला होता... त्याने हमाल दे धमाल चित्रपटातील गाण्यावर डान्स करुन बाबांची आपल्यातली झलक दाखवून दिली.