कविताने इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साइटवर तिच्या लग्नाचे काही फोटो पोस्ट केले आहेत. कविताच्या लग्नाला तिची जवळची मैत्रीण अभिनेत्री आक्षका गोराडिया उपस्थित होती. लग्नात तसेच हळदीला ती सतत कवितासोबतच होती. तसेच आक्षकाचा अमेरिकन प्रियकर ब्रेंट गोबलनेदेखील लग्नाला हजेरी लावली. कविताने हिमालयाला जात असतानाचे काही मजा-मस्तीचे फोटो पोस्ट केले आहेत.
एका फोटोत ती आणि आक्षका त्यांची मेहेंदी दाखवत असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. तसेच लग्न केल्यानंतर त्यांनी हिमालयाच्या सान्निध्यातदेखील एक फोटो काढला आहे. या फोटोत कविताने साडी नेसली असून खूप सारे दागिने घातले आहेत. भारतीय वधूच्या वेशात ती खूपच सुंदर दिसत आहे.
रोनितसोबत लग्न करण्याआधी कविताचे अभिनेता नवाब शहा याच्यासोबत पाच वर्षं प्रेमप्रकरण सुरू होते. त्यांनी काहीच महिन्यांपूर्वी संगनमताने त्यांच्या नात्याला पूर्णविराम दिला. कविता आणि नवाब यांना लग्न करायचे होते. पण कविताच्या आईवडिलांनी या लग्नाला नकार दिला होता. त्या दोघांचा धर्म वेगवेगळा असल्याने कविताच्या पालकांनी लग्नाला नकार दिला असल्याची चर्चा होती. आपल्या आईवडिलांना नाराज करुन लग्न करायचे नसल्याने तिने ब्रेकअपचा निर्णय घेतला होता.