1 / 7'सारेगमप लिटिल चॅम्प्स'ची विजेती गायिका कार्तिकी गायकवाडने (Kartiki Gaikwad) गेल्या वर्षी गोंडस मुलाला जन्म दिला. १३ मे रोजी तिने लेकाचा पहिला वाढदिवस धडाक्यात साजरा केला.2 / 7कार्तिकीने लेकाचं नाव 'रिषांक' असं ठेवलं आहे. रिषांकच्या पहिल्या वाढदिवसाचे फोटो तिने शेअर केलेत. यामध्ये कार्तिकीच्या स्टाईलनेही लक्ष वेधलं आहे.3 / 7कार्तिकी आणि पती रोनित पिसेने लेकाचा पहिला वाढदिवस एकदम वाजतगाजत साजरा केला आहे. लायन किंग थीम पार्टी, आकर्षक सजावट, भला मोठा केक अशी एकदम जय्यत तयारी केलेली फोटोंमधून दिसत आहे.4 / 7कार्तिकीने स्वत:साठी, पती आणि लेकासाठी खास ड्रेस कस्टमाईज करुन घेतले. सारखंच बेज कलर कॉम्बिनेशन, डिझायनर आऊटफिट अशा लूकमध्ये कार्तिकी दिसली. 5 / 7तिचा नवरा रोनित पिसे आणि एक वर्षांचा गोंडस मुलगा रिषांक दोघंही एकदम हँडसम दिसत आहेत. त्यांचा हा फॅमिली फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय.6 / 7कार्तिकी गायकवाड आणि रोनित पिसेने २०२० मध्ये थाटामाटात लग्न केले. त्यानंतर मागील वर्षी तिने मुलाला जन्म दिला. काही दिवसांपूर्वी कार्तिकी गायकवाडने तिच्या युट्यूब चॅनलवर 'नीज बाळा' ही अंगाई रिलीज केली होती. यामध्ये तिने लेकाचे नाव उघड केले आहे. 7 / 7कार्तिकी लेकाच्या जन्मानंतर लगेच कामावरही आली. अनेक ठिकाणी तिच्या गाण्याचे कार्यक्रम होतात. आजही गावागावात तिच्या आवाजाची जादू आहे.