कपिल शर्माला त्याच्या संपूर्ण टीममुळेच लोकप्रियता मिळालेली आहे. सुमोना, सुनील ग्रोव्हर, किकू शारदा, अली अजगर आणि नवज्योत सिंग सिद्धू अशी छान भट्टी यात जमून आली आहे. या कार्यक्रमातील प्रत्येक व्यक्तिरेखा या प्रेक्षकांच्या प्रचंड लाडक्या बनल्या आहेत. पण गेल्या काही दिवसांपासून सुमोना या कार्यक्रमातून गायब झाली आहे. त्यामुळे तिने हा कार्यक्रम सोडला का हा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडलेला आहे. पण ती मालिकेत परतणार असल्याची चर्चा सुरू आहे.
सुमोना सध्या कार्यक्रमाचे चित्रीकरण करत नसल्याने हॉलिडे एन्जॉय करत आहे. नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी ती नुकतीच श्रीलंकेला गेली होती. त्यावेळेचे काही फोटो तिने इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटवर तिने शेअर केले आहेत. या फोटोत एक वेगळीच सुमोना पाहायला मिळत आहे. तिचा या फोटोंमधील बोल्ड अवतार हा सध्या चर्चेचा विषय बनला आहे.
सुमोनाने कॉमेडी नाईट्स विथ कपिल, द कपिल शर्मा शो यांसारख्या कार्यक्रमात काम करण्यासोबतच काही बॉलिवुडच्या चित्रपटातही काम केले आहे. बडे अच्छे लगते है या मालिकेत तिने साकारलेली भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. मन या चित्रपटात एका छोट्याशा भूमिकेत सुमोना दिसली होती. मन हा तिच्या कारकिर्दीतला पहिला चित्रपट होता.